Harshvardhan Jadhavs exit from politics wife Sanjana Jadhavs entry into politics from Gram Panchayat elections

हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी संजना जाधव या पिशोर या त्यांच्या मूळ गावातून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पॅनल उभा केला आहे. आजूबाजूच्या गावांतही त्यांनी पॅनल उतरण्याची तयारी सुरु केली आहे. त्या ग्रामपंचाय निवडणुकीमध्ये सक्रीय झाल्या आहेत.

औरंगाबाद : कन्नड मतदारसंघाचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव ग्रामपंचायत निवडणुकीतून बाहेर पडण्याची दाट शक्यता आहे. कन्नड तालुक्यातील गावांत संजना जाधव यांनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. यावेळी हर्षवर्धन जाधव यांची पत्नी आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव या ग्रामपंचायत निवडणुक लढणार आहे. यासाठी त्यांनी तालुक्यातील गावांमध्ये पॅनल उतरवण्याची तयारी सुरु केली आहे.

हर्षवर्धन जाधव यांनी काहीदिवसांपूर्वीच राजकारणातून सन्यास घेतला आहे. नेहमी वादामुळे त्यांचे नाव चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच हर्षवर्धन जाधव यांनी राजकारणातून संन्यास घेत असल्याचे सांगितले. तसेच पत्नी यापुढील राजकारण पाहिल असेही त्यांनी एका व्हिडिओत म्हटले आहे.

हर्षवर्धन जाधव यांच्या पत्नी संजना जाधव या पिशोर या त्यांच्या मूळ गावातून ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पॅनल उभा केला आहे. आजूबाजूच्या गावांतही त्यांनी पॅनल उतरण्याची तयारी सुरु केली आहे. त्या ग्रामपंचाय निवडणुकीमध्ये सक्रीय झाल्या आहेत. यामध्ये हर्षवर्धन जाधव निवडणुकीत दिसत नसल्यामुळे त्यांनी राजकारणातून सन्यास घेतला असल्याचे दिसत आहे.

ग्राम पंचायत निवडणुकांबाबत महत्त्वाची माहिती

जात प्रमाणपत्राची पडताळणी आणि वैधता प्रमाणपत्र ऑनलाइन मिळेल
जात पडताळणीचा अर्ज एक खिडकी योजनेतून मिळेल
जातपडताळणी समितीला द्यावयाचा अर्ज तहसीलमध्ये मिळेल
निवडणूक जिंकल्यानंतर वैधता प्रमाणपत्र, जात पडताळणी प्रस्तावाची पोचपावती, ऑनलाइन पैसे भरल्याची पावती १२ महिन्यांत द्यावी लागेल
उमेदवाराला एका प्रभागातून एकच उमेदवारी अर्ज भरता येणार
अर्ज ऑनलाईन भरल्यानंतर हमीपत्र आणि घोषणापत्र निवडणूक अधिकाऱ्याला द्यावे
खर्च हिशेब देताना हमीपत्र, अपत्यांचे प्रमाणपत्र, शौचालय वापर प्रमाणपत्र, डिपॉझिटची पावती द्यावी लागेल
190 मुक्त चिन्हांपैकी उमेदवाराला 5 निवडणूक चिन्हे निवडता येणार
एका प्रभागात एका उमेदवाराचे चिन्ह दुसऱ्या उमेदवाराला मिळणार नाही
ग्रामपंचायतीचा थकबाकीदार, ठेकेदार नसल्याचे प्रमाणपत्र, नावात बदल नसल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागेल
७ आणि ९ सदस्यांच्या पंचायतीत खर्च मर्यादा २५ हजार रुपये
११ आणि १३ सदस्यांच्या पंचायतीत खर्च मर्यादा ३५ हजार रुपये
१५ आणि १७ सदस्यांच्या पंचायतीत खर्च मर्यादा ५० हजार रुपये
खुल्या प्रवर्ग उमेदवारांसाठी ५०० रुपये डिपॉझिट
SC-ST, OBC उमेदवारांसाठी १०० रुपये डिपॉझिट