औरंगाबादमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस, अनेकांच्या घरात शिरले पाणी

कालपासून औरंगाबादमध्ये (heavy Rain In Aurangabad)पावसाने रुद्रावतार धारण केला आहे.

    औरंगाबाद : कालपासून औरंगाबादमध्ये (heavy Rain In Aurangabad)पावसाने रुद्रावतार धारण केला आहे. कालपासून ढगफुटीसारखा पाऊस सुरु आहे. काल सुरुवातीच्या तीस मिनिटाच्या काळात ( ०७:४० पर्यंत) पाऊस पडण्याचा सरासरी  वेग हा १६६.७५ मिमी इतका नोंदला गेला. या तीस मिनिटांच्या कालावधीत ५६.२ मि.मी. पावसाची नोंद झाली. म्हणजेच औरंगाबाद शहरावर ढगफुटीपेक्षा वेगाने झोडपून काढले. (ताशी शंभर मि. मी. किंवा जास्त पाऊस झाल्यास ढगफुटी म्हंटली जाते)रात्री ०७:४० नंतर पावसाच वेग थोडा कमी होत गेला. रात्री ०७:५० पर्यंत सरासरी ८६.९ मि. मी. वेग होता व नंतर ०८:१० पर्यंत तो कमी होत ५३.२४ मि.मी. प्रति तास पावसाचा वेग राहिला. औरंगाबाद शहरात सायंकाळी ०७:१० ते ०८:१० या एका तासात  ८७.६  मि. मी. पावसाची नोंद झाली.

    शहरात सलग चार दिवसापासून पावसाची रिपरिप सुरू आहे. मंगळवारी सकाळीही रिपरिप सुरू होती. मात्र, रात्री सातच्या सुमारास पावसाने रौद्र रूप दाखविले. तासाभरात जवळपास शंभर मिलिमीटरच्या वर जवळपास पाऊस झाल्याने शहरातील सर्वच नाल्यांना पूर आला तर रस्त्यांवर सुद्धा पुरासारखी परिस्थिती होती. शहरातील किराडपुरा येथील नाला, रहेमानिया कॉलनी, पंचकुआ कब्रस्तान, औषधी भवन, सातारा-देवळाई येथील नाल्याला पूर आला होता. कॅनॉट परिसरात येथे एक झाड पडल्याने येथील वाहतूक बंद झाली होती. शिवाय येथील रस्त्यावरसुद्धा पाणीच पाणी होते.

    औरंगाबाद शहरातील नारेगाव, मसनतपूर, चिकलठाणा, हिनानगर, जाधववाडी, मिसारवाडी, आंबेडकरनगर, हर्सूल, जटवाडा, स्वामी विवेकानंद नगर, उद्धव पाटील नगर, आरेफ कॉलनी, भीमनगर, जयसिंगपुरा, पहाडसिंगपुरा, बेगमपुरा, भावसिंगपुरा, छावणी, पडेगाव, मिटमिटा, विटखेडा, नक्षत्रवाडी, कांचनवाडी, सातारा, देवळाई, सादातनगर, नागसेननगर, गारखेडा, जयभवानीनगर, जुना मोढा, संजयनगर, भवानीनगर, सिडको-हडको, पुष्पनगरी, मुकुंदवाडी, रामनगर यासह जुन्या शहरातील उल्कानगरी, श्रेयनगर, जवाहरनगर, सहकारनगर, उत्तमनगर, समर्थनगर, क्रांती चौक, सिल्लेखाना, जुना बाजार, किराडपुरा, नेहरूनगर, बुढीलेन, सिटीचौक, वैलासनगर, कटकटगेट, रोषणगेट, गणेश कॉलनी, बायजीपुरा या भागात रस्त्यावर पाणीच पाणी होते. अनेक घरात पाणी साचले.