husband fed up of wife

आपण अनेकदा पाहिले आहे की नवरे छळतात म्हणून बायका पोलिसांकडे तक्रार करत असतात. मात्र औरंगाबादमध्ये सध्या वेगळे चित्र दिसून येत आहे. अनेक नवऱ्यांनी बायका आम्हाला छळतात, अशी तक्रार केली आहे.

औरंगाबाद : आपण अनेकदा पाहिले आहे की नवरे छळतात म्हणून बायका पोलिसांकडे तक्रार करत असतात. मात्र औरंगाबादमध्ये सध्या वेगळे चित्र दिसून येत आहे. अनेक नवऱ्यांनी बायका आम्हाला छळतात, अशी तक्रार(husbands complaint against wife) केली आहे.

औरंगाबादमधल्या(aurangabad) २००पेक्षा जास्त नवऱ्यांनी आपल्या पत्नीच्या विरुद्ध भरोसा तक्रार सेलमध्ये तक्रारी केल्या आहेत .पीडित महिला आणि मुलांसाठी हा सेल सुरू करण्यात आला. पण तिथं आता बायकोच्या त्रासाला कंटाळलेल्या न‌वऱ्यांच्या तक्रारी येत आहेत.

या तक्रारींमध्ये माझी बायको छळ करते, मला समजून घेत नाही, आईवडिलांसोबत राहत नाही, मोबाईलमुळे संसाराकडेे दुर्लक्ष करते, बायकोच्या माहेरचे छळ करतात, बायकोचे आईवडिल तिला नांदायला पाठवत नाहीत, इत्यादी तक्रारींची संख्या जास्त आहे.

यातल्या काही तक्रारी पोलिसांनी समुपदेशन करुन सोडवल्या आहेत. मात्र काही वाद हे घटस्फोटापर्यंत पोहोचले आहेत.  त्यामुळे पोलिसांना देखील मानसोपचारतज्ज्ञांची मदत घ्यावी लागत आहे. केवळ कायद्याचा दंडुका दाखवून सगळेच प्रश्न सुटत नाहीत. संसाराचा गाडा सुरळीत चालावा, यासाठी पोलिसांनाही सामोपचाराचा मध्यम मार्ग स्वीकारावा लागतो. पण वाढत्या तक्रारींमुळं पोलिसांचे काम वाढले आहे.