काँग्रेसमध्ये ज्यांचे कोणी नाही त्यांच्यासोबत मी आहे; नितीन राऊतांची कार्यकर्त्यांना ग्वाही

औरंगाबाद जिल्ह्यात काँग्रेसचा आमदार किंवा खासदार नसला तरी तुम्ही निराश होऊ नका. काँग्रेसमध्ये ज्यांचे कोणी नाही त्यांच्यासोबत मी आहे, अशी ग्वाही ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिली आहे. राऊत औरंगाबाद जिल्ह्यातील दौऱ्यावर आले होते. त्यावेळी काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी हा शब्द दिला आहे.

    औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात काँग्रेसचा आमदार किंवा खासदार नसला तरी तुम्ही निराश होऊ नका. काँग्रेसमध्ये ज्यांचे कोणी नाही त्यांच्यासोबत मी आहे, अशी ग्वाही ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिली आहे. राऊत औरंगाबाद जिल्ह्यातील दौऱ्यावर आले होते. त्यावेळी काँग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी हा शब्द दिला आहे.

    काँग्रेसची विचारधारा ही राज्यघटनेची विचारधारा आहे. काँग्रेस केवळ एक पक्ष नसून एक विचार आहे. समता, बंधुता आणि स्वातंत्र्याचे विचार हे काँग्रेसच्या राजकीय विचारधारेचा भाग आहेत. काँग्रेसमध्ये ज्यांचे कोणी नाही त्यांच्यासोबत मी आहे. त्यांच्यासोबत काँग्रेसचे नेते राहुल गांधी आहेत आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आहेत. ज्यांना मदत लागेल, त्यांनी सांगावे, मी मदत नक्की करेल असे नितीन राऊत म्हणाले.

    हे सुद्धा वाचा