पर्यटनाला चालना देण्यासाठी आय लव्ह औरंगाबादचा पुढाकार ; शहराला सुंदर, आकर्षक बनविण्याचा प्रयत्न

ऐतिहासिक औरंगाबाद शहर (Aurangabad City) विविध पर्यटनक्षेत्रांनी नटलेला आहे. याचे सौंदर्यात अजून भर पडावी, पर्यटकाला शहराचा (beautiful, attractive) आकर्षण व्हावा, यासाठी आय लव्ह औरंगाबादने पुढाकार घेतला आहे. यासाठी बुधवारी (११ नोव्हेबर) आय लव्ह औरंगाबादतर्फे भडकल गेट येथील हॉटेल ग्रेट सागर येथे सेल्फी पॉइंट (Selfie Point) सुरु करण्यात आला.

औरंगाबाद : ऐतिहासिक औरंगाबाद शहर (Aurangabad City) विविध पर्यटनक्षेत्रांनी नटलेला आहे. याचे सौंदर्यात अजून भर पडावी, पर्यटकाला शहराचा (beautiful, attractive) आकर्षण व्हावा, यासाठी आय लव्ह औरंगाबादने पुढाकार घेतला आहे. यासाठी बुधवारी (११ नोव्हेबर) आय लव्ह औरंगाबादतर्फे भडकल गेट येथील हॉटेल ग्रेट सागर येथे सेल्फी पॉइंट (Selfie Point) सुरु करण्यात आला.

खासदार इम्तियाज जलील यांच्या हस्ते पॉइंटचे उदघाटन करण्यात आले. यावेळी सिटी चौक पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक संभाजी पवार, मोहसीन अली, नायब अन्सारी, शोएब खुसरो, माजी नगरसेवक जमीर अहमद कादरी, शारेख नक्षबंदी, इरबाज अन्सारी, सय्यद शकील यांच्यासह मान्यवारंाची उपस्थिती होती. यावेळी शहरात स्वच्छतेसह सुदंरतेकडे सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे, असे मत खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले.

आय लव्ह औरंगाबादचे इरबाज अन्सारी यांनी हा पहिलाच प्रकल्प असून यासारखे अनेक प्रकल्प शहरातील विविध ठिकाणी राबविण्याचे नियोजन असून माझे शहर स्वच्छ व सुंदर शहर करण्यास पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे सांगितले.