कुठल्याही परिस्थितीत ५२०० पदे तातडीने भरणार; गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची घोषणा

  औरंगाबाद : महाराष्ट्र पोलीस दलात एकूण १२ हजार २०० पदांची भरती होत असून पहिल्या टप्प्यात ३१ डिसेंबर पूर्वी ५२०० पदांची भरती कुठल्याही परिस्थितीत करणार असून त्यानंतर ७ हजर पदे भरले जातील अशी माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यानी औरंगाबाद येथे

  पत्रकारांशी बोलताना दिली. दिलीप वळसे पाटील म्हणाले, आज औरंगाबाद परिक्षेत्राची बैठक झाली. कायदा सुव्यवस्था परिस्थिती आणि गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण, गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण याबाबत चर्चा करण्यात आली. कर्मचाऱ्यांना चांगली घरे चांगली सुविधा मिळाव्यात याबाबत चर्चा झाली आहे.

  आर्थिक आणि सायबर गुन्हे वाढले

  सर्वसामान्य माणसाला सौजण्याची वागणूक मिळाली पाहिजे. महिला आणि त्याबाबत घडणारे गुन्हे याबाबत आस्थेवाईकपणे निर्णय घेतले पाहिजे. दोषींना शिक्षा केली पाहिजे या सूचना दिल्या असल्याचे दिलीप वळसे पाटील म्हणाले. आर्थिक गुन्हे आणि सायबर गुन्हे यांचे प्रमाण वाढले आहे. आर्थिक गुन्हे शाखा आणि सायबर शाखेने चांगले काम केले पाहिजे. सोशल मीडियातून महिलांची बदनामी केली जाते याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे.

  कर्जासाठी मदत करण्याचा प्रयत्न

  पोलीस कर्मचाऱ्यांना कर्ज मिळत नाही ते वाटप करण्याच्या दृष्टीने विचार केला जात आहे. संख्या वाढत आहे, रक्कम वाढत आहे, कोविडची अडचण आहे पण कर्जासाठी मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कोविडमध्ये ज्य पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला त्यांच्या पाल्यांना नोकरी देण्याचे धोरण आहे. काही ठिकाणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे,.५० लाख देण्याचे काम पूर्ण झाले आहे, जे राहील आहे त्यांना पण तातडीने मदत केली जाईल, अशी माहिती वळसे पाटील यांनी दिली.