corona cases

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकाडा हा ३३ हजार ४११ वर पोहोचला आहे. यापैकी सध्या ५ हजार ८५७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुळे ९३० बाधितांचा मृत्यू झाला आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाचे (Corona Virus) रौद्ररुप कायम आहे. कोरोना रुग्णांची संख्या (corona cases ) वाढतच आहे. गेल्या २४ तासात औरंगाबादमध्ये (Aurangabad  Corona Update) २३७ कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर ५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकाडा हा ३३ हजार ४११ वर पोहोचला आहे. यापैकी सध्या ५ हजार ८५७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुळे ९३० बाधितांचा मृत्यू  ( died) झाला आहे.

परंतु यामध्येही चांगली बाब ही आहे की, जिल्ह्यात एकून २६ हजार ६२४ जणांनी कोरोनावर यशस्वी मात करुन घरी परतले आहेत. जिह्यातील सीमांवर केलेल्या अँटीजेन टेस्टमध्येही ७१ कोरोनाबाधित मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास पासडले आहेत. तर ग्रामीण भागात ६२ रुग्ण आढळले आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.