Corona Virus Image

औरंगाबादेत (Aurangabad)  कोरोनाचा कहर सुरूच आहे. गेल्या २४ तासांत ४०६ जणांना कोरोनाची लागण (Corona Positive) झाली आहे. तर ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू (Deaths) झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा २९ हजार २०८ एवढा झाला आहे.

औरंगाबाद : राज्यात कोरोना विषाणूचे संकट (Corona Virus) दिवसागणिक वाढत आहे. तसेच औरंगाबादेत (Aurangabad)  कोरोनाचा कहर सुरूच आहे. गेल्या २४ तासांत ४०६ जणांना कोरोनाची लागण (Corona Positive) झाली आहे. तर ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू (Deaths) झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा २९ हजार २०८ एवढा झाला आहे.

सध्या जिल्ह्यात ५ हजार ९६२ रुग्णांवर उपचार सुरू (Active Cases)  आहेत. तर कोरोनामुळे आतापर्यंत सुमारे ८२४ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे २२ हजार ४२२ जणांनी कोरोनावर मात केली आहे. अँटीजेन टेस्टद्वारे (Antigen Test) केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर ५५, मोबाईल स्वॅब कलेक्शन (Swab Connection) पथकास १२७ आणि ग्रामीण भागात ९३ रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे :

औरंगाबाद, फुलंब्री , ग्रामीण, कमलापूर फाटा, रांजणगाव, वडगाव कोल्हाटी, लिलासेन, रांजणगाव, शहापूर, माळी गल्ली, रांजणगाव, सिडको महानगर, पिंपळवाडी, गंगापूर, नवीन बसस्टँड, गंगापूर, श्रीराम नगर, वडगाव को.,प्राथमिक आरोग्य केंद्र, निलजगाव, चित्तेपिंपळगाव आदी. भागांचा समावेश आहे.