औरंगाबादमध्ये ७६ कोरोना संशयितांचा अहवाल आला पॉझिटिव्ह

  • जिल्ह्यात रविवारी (दि २ ऑगस्ट) सकाळी ७६ रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्हा आले आहेत. यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४४०३ वर पोहोचली आहे. यातील १०६०१ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाने धूमाकूळ घातला आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या औरंगाबाद जिल्ह्यात वाढतच आहे. प्रशासनाच्या उपाययोजना फेल ठरत असल्याचे चित्र दिसत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित केला होता. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्याने कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरला आहे. 

जिल्ह्यात रविवारी (दि २ ऑगस्ट) सकाळी ७६ रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्हा आले आहेत. यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १४४०३ वर पोहोचली आहे. यातील १०६०१ कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच कोरोनामुळे जिल्ह्यात ४७८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. चालु परिस्थितीत ३३२४ कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने दिली आहे.