mahavitran

  • वीज पुरवठा आज (शुक्रवार, दि. ०८ ऑगस्ट २०२०) तीन ते चार तास खंडित करण्यात येणार आहे. महावितरणाचे दुरुस्तीचे काम शहरात टप्प्या टप्प्यात करण्यात येणार आहे. विभागानुसार करण्यात येणार आहे.

औरंगाबाद : महावितरणाच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या तातडीच्या कामांसाठी औरंगाबाद शहरातील काही भागांतील ग्राहकांचा वीज पुरवठा आज (शुक्रवार, दि. ०८ ऑगस्ट २०२०) तीन ते चार तास खंडित करण्यात येणार आहे. महावितरणाचे दुरुस्तीचे काम शहरात टप्प्या टप्प्यात करण्यात येणार आहे. विभागानुसार करण्यात येणार आहे. याबाबत महावितरणाने माहिती दिली आहे.

१ विभाग – शुक्रवार सकाळी ११ ते दुपारी ३ या वाजेपर्यंत एन-९ एम-२ आणि एन-७ वीज नसेल तर सकाळी १० ते ११ आणि दुपारी ५ ते ५.३० या वेळेत वाळूज एमआयडीसीमधील एम- सेक्टरच्या काही भागांत वीजपुरवठा बंद राहील. पैठण रोड, ईटखेडा, वैतागवाडी, अध्यात्मनगर या विभागात सकाळी ११ ते २ या वेळेत वीज खंडीत केली जाईल. दिल्ली गेट फीडरवरील सर्व परिसरात सकाळी १० ते ३ पर्यंत वीजपुरवठा बंद असणार आहे.

२ विभाग- सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत हायकोर्ट परिसर व क्वार्टर ते संभाजी कॉलनीपर्यंतच्या भागांत वीज पुरवठा खंडीत केला जाईल. तसेच सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत विश्रांती नगर, तिरुपती कॉलनी ते मोतीवाला स्क्वेअर, एशियन रुग्णालया पर्यंतच्या भागात वीज खंडीत करण्यात येणार आहे.

सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत चाणक्यपुरी सोसायटी, सिग्मा हॉस्पिटल, देवानगरी ते चिकलठाणा एमआयडीसी, एच, डब्ल्यु, एफ सेक्टर पर्यंतच्या भागातील वीज पुरवठा खंडीत केला जाईल.

शिवाजीनगर उपकेंद्र – या परिसरात सकाळी ११ ते  १ वाजेपर्यंत वीजपुरवठा बंद राहणार आहे. महावितरणाचे काम दिलेल्या मुदतीत किंवा त्यानंतर पूर्ण होऊ शकते. महावितरणाने वीजग्राहकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. काम सुरळीत पार पडल्यावर वीज पुरवठा सुरु करण्यात येणार आहे.