औरंगाबादमध्ये कोरोना रुग्णांनी ओलांडला २२ हजारांचा टप्पा, २४ तासात ७८ जण कोरोनाबाधित

औरंगाबादमध्ये शहरी तसेच ग्रामीण भागात कोरोनाचा प्रकोप वाढला आहे. गेल्या २४ तासात सापडलेल्या कोरोनाबाधितांसह जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २२ हजार २६३ एवढा झाला आहे. तर ६७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. (Aurangabad, corona patients) प्रशासन कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. गेल्या २४ तासात औरंगाबादमध्ये ७८ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

औरंगाबादमध्ये शहरी तसेच ग्रामीण भागात कोरोनाचा प्रकोप वाढला आहे. गेल्या २४ तासात सापडलेल्या कोरोनाबाधितांसह जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २२ हजार २६३ एवढा झाला आहे. तर ६७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. एकूण ४ हजार ६१२ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. तर १६ हजार ९७९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.