corona

औरंगाबाद(aurungabad) जिल्ह्यात आज ४०४ जण(मनपा २६४, ग्रामीण १४०) कोरोनातून(corona) बरे झाले. आजपर्यंत एकूण २९०८२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण १९३ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३४३८६ झाली आहे. आजपर्यंत एकूण ९५८ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण ४३४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

औरंगाबाद: औरंगाबाद(aurungabad) जिल्ह्यात आज ४०४ जण(मनपा २६४, ग्रामीण १४०) कोरोनातून(corona) बरे झाले. आजपर्यंत एकूण २९०८२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण १९३ कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३४३८६ झाली आहे. आजपर्यंत एकूण ९५८ जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण ४३४६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास ५२ आणि ग्रामीण भागात १९ रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

घाटीत कन्नड तालुक्यातील चापानेर येथील ७० वर्षीय पुरूष, वैजापूर तालुक्यातील गाढेपिंपळगावातील ९० वर्षीय स्त्री, तिसगावमधील म्हाडा कॉलनीतील ८० वर्षीय पुरूष आणि खासगी रुग्णालयांत छावणीतील ६९ वर्षीय पुरूष, टीव्ही सेंटरमधील ७३ वर्षीय पुरूष, सिल्लोड तालुक्यातील स्नेह नगरातील ४२ वर्षीय पुरूष या कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.