In Aurangabad, the ATM machine could not be blown up and the entire machine was stolen by the thieves

चोरांनी ATM मशीन फोडण्याचा प्रयत्न केला मात्र, मशीन फुटत नसल्याचे पाहून चोरटयांनी चक्क पूर्ण मशीन उखडून सोबत नेले. या प्रकारामुळे पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

औरंगाबाद : चोरट्यांनी ATM मशीन फोडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मात्र, औरंगाबादमधील चोरट्यांनी वेगळाच पराक्रम केला आहे. ATM मशीन फोडता न आल्याने अख्ख मशीनच चोरट्यांनी पळवून नेले आहे.

औरंगाबाद-पैठण रोडवरील ढोरकीन गावात ही ATM मशीनची चोरी झाली आहे. ढोरकीन गावातील बाजारपेठेत इंडिया बँकेचं एटीएम सेंटर आहे. गुरुवारी दुपारी या एटीएममध्ये रोकड भरण्यात आली होती. मध्यरात्री चोरांनी मशीन फोडण्याचा प्रयत्न केला मात्र, मशीन फुटत नसल्याचे पाहून चोरटयांनी चक्क पूर्ण मशीन उखडून सोबत नेले. या प्रकारामुळे पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चोरांचा माग काढण्यासाठी पोलिस पथकासह फॉरेन्सिक, डॉग स्कॉड, घटनास्थळी दाखल झाले आहेत. चोरट्यांनी एटीएम मशीन चारचाकी वाहनातून नेले असावे असा पोलिसांचा अंदाज आहे.