औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा २७ हजारांच्या पुढे, ४३७ नव्या रुग्णांच नोंद

औरंगाबादमध्ये एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २७ हजार २८९ वर गेली आहे तर ५,८०३ रुग्णांचा कोरोनाशी संघर्ष सुरुच आहे. जिल्ह्यातील ७८२ रुग्णांचा कोरोनावर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनावर २० हजार ७०४ कोरोनाबाधित रुग्णांनी मात दिली आहे.

औरंगाबाद : औरंगाबादमध्ये (Aurangabad) कोरोनाचा संसर्ग धुमाकूळ घालत आहे. कोरोनाचा प्रकोप वाढतच चालला आहे. त्यामुळे औरंगाबाग जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. ( number of corona disease patients) कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. गेल्या २४ तासात औरंगाबादमध्ये कोरोनाची ४३७ नवे प्रकरण सापडले आहेत. ( corona cases)  १३ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

औरंगाबादमध्ये एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २७ हजार २८९ वर गेली आहे तर ५,८०३ रुग्णांचा कोरोनाशी संघर्ष सुरुच आहे. जिल्ह्यातील ७८२ रुग्णांचा कोरोनावर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनावर २० हजार ७०४ कोरोनाबाधित रुग्णांनी मात दिली आहे.

तसेच गेल्या २४ तासात अँटीजेन टेस्टमध्ये ७३ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास १०३ आणि ग्रामीण भागातील ७४ रुग्ण कोरोनाबाधित आढळले आहेत. असी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.