corona

  • शनिवारी घेण्यात येणाऱ्या १३४ कोरोना संशयितांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात कोरोनाच्या ४१६० रुग्णावर उपचार सुरु आहेत तर ३९२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच एकूण १०५३८ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. अँटिजेन टेस्टच्या अधारे सिटी इंट्री पॉइंटवर केलेल्या चाचणीत ८५ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

औरंगाबाद – औरंगाबादमध्ये कोरोनाने थैमान घातले होते. कोरोना विषाणूने औरंगाबादमधील आरोग्य यंत्रणेचे आणि प्रशासनाचे धाबे दणानले होते. कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरणाऱ्या औरंगबादमध्ये परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी १० दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला होता. त्यामुळे लॉकडाऊनची मुदत संपली आहे. जिल्ह्यातील लॉकडाऊन उघडण्यात आलेला आहे. परंतु औरंगाबादमधील कोरोना रुग्णांचा आकडा चिता वाढवणारा आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या १० हजारांचा पुढे आहे. 

शनिवारी घेण्यात येणाऱ्या १३४ कोरोना संशयितांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात कोरोनाच्या ४१६० रुग्णावर उपचार सुरु आहेत तर ३९२ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच एकूण १०५३८ कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. अँटिजेन टेस्टच्या अधारे सिटी इंट्री पॉइंटवर केलेल्या चाचणीत ८५ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.