बिडकीन निलजगाव रोडवरील ‘दक्षता पेट्रोल पंपाचे’ उद्घाटन; नफ्याचा पैसा पोलिस कल्याणासाठी उपयोगात आणणार

पोलीस अधीक्षक यांचे प्रयत्नातून औरंगाबाद ग्रामीण जिल्हयात पोलीस अधीक्षक कार्यालयाअंतर्गत सुरू करण्यात आलेला हा सलग दुसरा अद्यावत संसाधनयुक्त पेट्रोलपंप असून यामाध्यमांतून मिळणा-या उत्पन्नातील नफा हा पोलीस कल्याण अंतर्गत पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच त्यांचे पाल्य व कुटुंबीय यांचेकरिता राबविण्यात येणा-या विविध योजना, उपक्रम यासाठी उपयोगी ठरणार आहे.

    औरंगाबाद (Aurangabad) : पोलीस अधीक्षक कार्यालय अंतर्गत बिडकीन निलजगाव रोडवर नव्याने उभारण्यात आलेला सर्व सुविधायुक्त अद्यावत असा “दक्षता पेट्रोलपंप”चे उद्घाटन आज रोजी सकाळी मोक्षदा पाटील, पोलीस अधीक्षक यांचे शुभ हस्ते करण्यात आले. सदरचा पेट्रोलपंप हा कार्यान्वित करण्यात आला आहे.

    पोलीस अधीक्षक यांचे प्रयत्नातून औरंगाबाद ग्रामीण जिल्हयात पोलीस अधीक्षक कार्यालयाअंतर्गत सुरू करण्यात आलेला हा सलग दुसरा अद्यावत संसाधनयुक्त पेट्रोलपंप असून यामाध्यमांतून मिळणा-या उत्पन्नातील नफा हा पोलीस कल्याण अंतर्गत पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच त्यांचे पाल्य व कुटुंबीय यांचेकरिता राबविण्यात येणा-या विविध योजना, उपक्रम यासाठी उपयोगी ठरणार आहे.

    याप्रसंगी गोरख भामरे, उपविभागीय पोलीस अधिकारी, पैठण, राकेश सरोज, GM Sales, लक्ष्मण देशमुख, मॅनेजर, इंडियन ऑईल लि. सपोनि संतोष माने, पो.स्टे. बिडकीन  यांची प्रमुख उपस्थिती होती. त्याचप्रमाणे पोलीस अधीक्षक यांनी पो.स्टे. बिडकीन येथे भेट देऊन पो.स्टे. अभिलेख, गुन्हे अभिलेख, तपासावरील गुन्हयांचा आढावा घेऊन तेथील मुद्देमाल कक्ष, बंदीगृह, (महिला व पुरूष), पोलीस ठाण्यास उपलब्ध दारूगोळा व सामान, महिला अधिकारी व कर्मचारी यांचे विश्रांतीगृह, पोलीस ठाणे परिसरात बेवारस व जप्त वाहनांचा निर्गतीबाबत सूचना केल्या आहेत.

    दंगल नियंत्रण प्रसंगी किंवा कायदा व सुव्यवस्था बंदोबस्ताच्या वेळी आवश्यक सुरक्षा साधने पोलीस वाहनात उपलब्ध ठेवण्याचे दृष्टीने पोलीस वाहनांची पाहणी करून पोलीस अंमलदार यांची बंदोबस्ताचे अनुषंगाने लाठी, हेल्मेट, शिल्ड, बॅरिकेटस् इ. बाबत तपासणी केली.

    तसेच पोलीस ठाण्यास नियुक्त महिला व पुरूष अंमलदार यांचे सोबत संवाद साधुन त्यांना असणा-या अडचणीबाबत आस्थवाईकपणे विचारपुस करून पोलीस पाल्यांचे शैक्षणिक अडचणी असल्यास त्या तात्काळ पोलीस कल्याण मार्फेत सोडविण्यात येतील तसेच पोलीस अंमलदार यांना कर्तव्याचे अनुषंगाने अडचणी आल्यास तात्काळ बिनदिक्कतपणे संपर्क साधावा कायम त्यांचे पाठीशी भक्कम पणे उभे असुन तक्रारीचे निरसरण करण्यात येईल असे आश्वासित केले आहे.