औरंगाबाद जिल्ह्यात आज ६६ नव्या कोरोनाबाधितांची वाढ…

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. परंतु मुंबई, ठाणे, आणि पुणे या जिल्ह्यानंतर आता औरंगाबाद जिल्ह्यातही कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. औरंगाबादमध्ये आज सकाळी ६६ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे. त्यामुळे एकूण संख्या ९ हजार ५१० वर पोहोचली आहे. 

कोरोनाचा संसर्ग पाहता औरंगाबादमध्ये १० जुलै ते १८ जुलै दरम्यान आठ दिवसांसाठी ल़ॉकाडाऊन करण्यात आला आहे. जिल्ह्यातील ९ हजार ५१० कोरोनाबाधितांपैकी जवळपास ५ हजार जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर ३७० जणांचा मृत्यू झाला आहे. आज आढळलेल्या ६६ रुग्णांमध्ये औरंगाबाद शहरातील २१ तर ग्रामीण भागातील ३१ रुग्णांचा समावेश आहे.