इंडोनेशिया कॉन्सुलेट जनरल यांच्याकडून ऑरिक सिटीची पाहणी; उद्योजकांशी साधला संवाद

औरंगाबाद (Aurangabad). इंडोनेशिया कॉन्सुलेटचे कॉन्सुलेट जनरल ऑगस्त सप्टोनो आणि कॉन्सुल यदी सुरीयाहादी यांनी शहरातील ऑरिक सिटीची (औरंगाबाद औद्योगिक शहर) आज पाहणी केली. येथील प्रकल्पात उद्योजकांना देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत समाधान व्यक्त करतानाच ऑरिकमध्ये गुंतवणूक योग्य वातावरण असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ऑरिकच्या प्रशासकीय इमारतीत ऑरिक प्रकल्पाबाबत त्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. सुरुवातीला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी राजेश जोशी यांनी त्यांचे स्वागत केले. त्यानंतर प्रकल्पाची माहिती नकाशाद्वारे दिली. यामध्ये प्रकल्पांतर्गत सध्या असलेल्या विविध नामांकित कंपन्या, प्रकल्पातील देण्यात येणाऱ्या विविध सुविधांची माहिती देण्यात आली. इमारतीत असलेल्या कमांड कंट्रोल रूममधून ऑरिक प्रकल्पातील सुविधांबाबतची श्री.सप्टोनो यांना माहिती देण्यात आली. त्यानंतर सभागृहात सप्टोनो यांनी शहरातील विविध उद्योग संघटनांच्या पदाधिकारी यांच्याशी मनुष्यबळ, उद्योगातील सुविधा, उत्पादने, कर सवलत, रोजगार निर्मिती आदी विविध विषयांवर उद्योग वृद्धीबाबत चर्चा केली.

यावेळी उद्योग विभागाचे सहसंचालक बळवंत जोशी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक के.जी.डेकाटे, ऑरिकचे सहायक महाव्यवस्थापक शैलेश धाबेकर, उपविभागीय अधिकारी डॉ.ज्ञानोबा बानापुरे, कार्यकारी अभियंता भूषण हर्षे, उद्योजक प्रसाद कोकीळ, रमण अजगावकर आदींची उपस्थिती होती. आभार श्री.कोकीळ यांनी मानले.

ट्रेड एक्सपोमध्ये सहभागी होण्याचे आवाहन
इंडोनेशियाच्या ट्रेड एक्स्पो 10 ते 16 नोव्हेंबर दरम्यान व्हर्चुअल स्वरूपात आयोजित करण्यात आलेला आहे, यामध्ये औरंगाबादच्या उद्योजकांनी सहभागी होण्याचे आवाहन सप्टोनो यांनी केले.