Inspection of parking space of CIDCO Connaught Place by the Commissioner; Will discuss with police regarding parking

सिडको कॅनॉट प्लेस येथील नागरिकांची व वाहनांची गर्दी लक्षात घेता कॅनॉट प्लेस मध्ये येणाऱ्या ग्राहकांची गैरसोय ,येथील पार्किंग प्रश्न महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांन ऐरणीवर घेतला असून पार्किंग व्यवस्था कशी करता येईल .यासंदर्भात संपूर्ण कॅनॉट परिसर व परिसरातील सर्व अपार्टमेंटमधील पार्किंगच्या जागेची पाहणी केली, कुठे, कशा पद्धतीने पार्किंग व्यवस्था करता येईल.

  औरंगाबाद : सिडको कॅनॉट प्लेस येथील पार्किंग व्यवस्थाबाबत व स्ट्रेट फोर पीपल्स हा स्मार्ट सिटी अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या उपक्रमाच्या जागेची आज गुरुवारी महानगरपालिका आयुक्त प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी पाहणी केली. या संदर्भात पोलीस आयुक्त निखील गुप्ता यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासक यांनी सांगितले.

  सिडको कॅनॉट प्लेस येथील नागरिकांची व वाहनांची गर्दी लक्षात घेता कॅनॉट प्लेस मध्ये येणाऱ्या ग्राहकांची गैरसोय ,येथील पार्किंग प्रश्न महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांन ऐरणीवर घेतला असून पार्किंग व्यवस्था कशी करता येईल .यासंदर्भात संपूर्ण कॅनॉट परिसर व परिसरातील सर्व अपार्टमेंटमधील पार्किंगच्या जागेची पाहणी केली, कुठे, कशा पद्धतीने पार्किंग व्यवस्था करता येईल.

  तसेच स्मार्ट सिटीच्या स्ट्रीट फॉर पीपल्स या उपक्रमाबाबत अर्बन रिसर्च फाउंडेशन च्या श्रीनिवास देशमुख, पल्लवी देवरे ,माधुरा कुलकर्णी, उपायुक्त अपर्णा थेटे, शहर अभियंता एस .डी .पानझडे, घनकचरा व्यवस्थापन विभागप्रमुख नंदकिशोर भोंबे, टाऊन प्लॅनिंग चे उप अभियंता संजय कोंबडे, कॅनॉट प्लेस व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष,ज्ञानेश्वर आप्पा खरर्डे, सचिव प्रमोद नगरकर यांच्याशी चर्चा केली. कॅनॉट परिसरातील पार्किंग व्यवस्था आणि स्ट्रीट फोर पीपल्स याबाबत अर्बन रिसर्च फाउंडेशन शी पुढील विषयावर चर्चा करण्यात आली.

  सर्व पाहणी करून महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी पुढील सूचना दिल्या.

  • सर्वप्रथम औरंगाबाद ट्रॅफिक पोलिस आणि पोलिस कमिशनर ह्यांच्या सोबत ह्याबाबत चर्चा होईल.
  • भागधारकांसोबत ( दुकानदार आणि रहिवासी )चर्चा करणे , CIDCO च्या प्लॅन नुसार दुकानदार आणि रहिवाशांचे पार्किंग बिल्डिंगच्या पाठीमागे करण्यात यावे. त्यासाठी दुकानदार आणि रहिवाश्यांसाठी वेगवेगळे स्टिकर देण्याचे प्रयोजन आहे.
  • कॅनॉट गार्डन चे सुशोभीकरण होणार.
  • कॅनॉट परिसरातील पथदिव्यांचा प्रकाश नीट पडावा यासाठी झाडे ट्रिम करावी लागणार.
  • कॅनॉट परिसर पादचाऱ्यांसाठी अनुकूल करण्यासाठी पावले उचलली जाणार. कॅनॉट परिसरातील प्रस्तावित पार्किंग प्लॅन आणि स्ट्रीट्स फॉर पिपल अंतर्गत नियोजन करतांना रहिवाश्यांच्या सुलभतेचासुद्धा विचार होणार.
  • कॅनॉट गार्डन परिसरात महिलांसाठी विशेष शौचालय असावे यासाठी सरांनी सहमती दर्शवली आहे.
  • संपूर्ण पादचारिकरणावर भर आदी सूचना दिल्या. यावेळी उपायुक्त अपर्णा थेटे, शहर अभियंता एस डी पानझडे, घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे, टाऊन प्लॅनिंग उप अभियंता संजय कोंबडे,स्मार्ट सिटीच्या स्नेहा नायर स्नेहा बक्षी, अर्पिता शरद आदी उपस्थित होते.

  अशी आहे योजना