rape

  • रुणी आपल्या मित्रासेबत बाहेर फिरायला गेली होती. औरंगाबादमधील भांगसीमात गडाजवळील डोंगरात दुचाकीने गेली होते. त्या ठिकाणी ही भयानक घटना घडली आहे. तरुणी आणि तिचा मित्र फिरायला गेले होते. त्यावेळी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास तरुणी गप्पा मारत असताना २ अज्ञात तरुण तिथे आले. त्यांनी तिच्या मित्राला आणि तिला मारहाण केली.

औरंगाबाद : देशात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत असल्याने लॉकडाऊन करण्यात आला आहे. मोठ्या प्रमाणात पोलीसांना तैनात करण्यात आले आहे. सर्व नागरिकांना घरीच राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परंतु राज्यात गुन्ह्यांच्या घटना वाढतच आहेत. लॉकडाऊन दरम्यानही अनेक गुन्ह्याच्या धक्कादायक घटना समोर आल्या आहेत. लॉकडाऊन असतानाही महिला सुरक्षित राहिलेल्या नाहीत. अपहरणाच्या अनेक घटनांची नोंद झाली आहे. तशीच एक घटना औरंगाबादमध्ये घडल्याचे उघडकीस आली आहे. तरुणी आपल्या मित्रासोबत फिरण्यास गेली होती. तेथे काही अज्ञातांनी तिचावर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. 

राज्यात कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आला आहे. सर्व प्रेक्षणीय स्थळे तसेच पर्यटनस्थळे बंद ठेवण्यात आले आहेत. असे असतानाही नागरिक घरी बसून कंटाळल्याने बाहेर पडत आहेत. अशातच तरुणी आपल्या मित्रासेबत बाहेर फिरायला गेली होती. औरंगाबादमधील भांगसीमात गडाजवळील डोंगरात दुचाकीने गेली होते. त्या ठिकाणी ही भयानक घटना घडली आहे. तरुणी आणि तिचा मित्र फिरायला गेले होते. त्यावेळी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास तरुणी गप्पा मारत असताना २ अज्ञात तरुण तिथे आले. त्यांनी तिच्या मित्राला आणि तिला मारहाण केली. तरुणीला बाजूच्या डोंगराळ भागात नेले व तिला मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली. व तिच्यावर अत्याचार केला. अशी माहिती तक्रारीमध्ये देण्यात आली आहे. मुलीने प्रचंड किंचाळत मदत मागण्याचा प्रयत्न केला. तरुणांच्या हातापाया पडत होती. परंतु नराधाम तरुणांनी काहीही एकले नाही. 

अज्ञातांविरोधात या प्रकरणी दौलताबाद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणाची पोलीस चौकशी करत आहेत. त्यांनी तपासादरम्यान एका संशयित आरोपीला ताब्यात घेतले होते. मात्र तो लघूशंकेचे कारण देत पशार झाला. पोलीस या प्रकरणी अज्ञातांचा शोध घेत आहे.