राज्यमंत्री अब्दुल सत्तार व जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत कोरोना लसीकरण अभियानाचा शुभारंभ

महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्प व सुचनेनूसार सिल्लोड - सोयगाव मतदारसंघात आयोजित मोफत कोरोना लसीकरण अभियानास नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सिल्लोड शहर व ग्रामीण भागात नागरिकांनी या अभियानात स्वयंस्फूर्तीने सहभागी होत लसीकरण करून घेतले. बजाज ग्रुपच्या सहकार्याने या अभियानासाठी कोरोना लस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

    सिल्लोड : महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या संकल्प व सुचनेनूसार सिल्लोड – सोयगाव मतदारसंघात आयोजित मोफत कोरोना लसीकरण अभियानास नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. सिल्लोड शहर व ग्रामीण भागात नागरिकांनी या अभियानात स्वयंस्फूर्तीने सहभागी होत लसीकरण करून घेतले. बजाज ग्रुपच्या सहकार्याने या अभियानासाठी कोरोना लस उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

    दरम्यान गुरुवारी महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते शहरातील नॅशनल हायस्कूलच्या प्रांगणात कोरोना लसीकरण अभियानाचा शुभारंभ पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जानकी देवी बजाज ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष सी. पी. त्रिपाठी, युवानेते अब्दुल समीर, नगराध्यक्षा राजश्री निकम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश गटणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीप मुरंबीकर आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

    तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लस घेणे आवश्यक – सत्तार

    कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी लस एकमेव उपाय आहे. लस घेतल्या शिवाय कोणीही सुरक्षित राहू शकत नाही. म्हणून प्रत्येकाने लस घ्यावी असे अवाहन राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी लसीकरण अभियान उदघाटन प्रसंगी केले. आपल्या लोकांच्या आरोग्याची काळजी घेणे आपली सामाजिक जबाबदारी असल्याने कोणीही लसीकरण पासून वंचित राहणार नाही यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे अशी भावना राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी याप्रसंगी व्यक्त केली. दरम्यान लसीकरणाची ही मोहीम सुरूच असणार असून येत्या 15 दिवसांत मतदारसंघात 100 टक्के लसीकरण करण्याचा निर्धार राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी केला.

    एका मार्मिक कथेचे उदाहरण देत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी कोरोना सलीचे महत्व पटवून दिले. भविष्यातील धोका पाहता आजच जर लस घेतली नाही तर येत्या काळात पश्चताप होईल. कोरोना लस घेतलेली नसल्यास प्रवास करता येणार नाही तसेच लस न घेतलेल्यांना व्ययक्तिक लाभाच्या योजनेपासून वंचित राहावे लागू शकते असे राज्यमंत्री अब्दुल सत्तार म्हणाले. बजाज ग्रुपने सामाजिक बांधिलकी जपत आपला उद्योग व्यवसाय केला. कोरोनाच्या संकटात बजाज ग्रुपने कोरोना लसीचा पुरवठा करून दिल्याबद्दल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी बजाज ग्रुप चे आभार व्यक्त केले.

    लसीकरण मोहिमेसाठी आणखी 80 हजार लस उपलब्ध करून देवू – बजाज ग्रुपचे सी. पी. त्रिपाठी यांची ग्वाही

    बजाज ग्रुप ने कायम सामाजिक बांधिलकी जपली, आपल्या लोकांसाठी काहीतरी करायचे यासाठी बजाज नेहमी प्रयत्नशील राहिले आहेत. लसीकरण कोरोना वर एकमेव उपाय असून लसीकरण झाल्यानंतर ही कदाचित कोरोना झाला असला तरी यापासून मृत्यू झाल्याचे अद्याप उदाहरण नाही अशा शब्दांत श्री. त्रिपाठी यांनी कोरोना लसीचे महत्त्व पटवून दिले. सुरुवातीला कोरोना लसीकरण बाबत राजकारण व काही अफवा पसरल्या याबाबत खंत व्यक्त करीत लस पूर्णपणे सुरक्षित आहे, कोणत्याही अफवांना बळी न पडता प्रत्येकाने लस घ्यावी असे आवाहन करीत लसीकरण मोहीमे साठी आणखी 80 हजार लस बजाज कडून उपलब्ध करून देवू अशी ग्वाही जानकी देवी बजाज ग्रामविकास संस्थेचे अध्यक्ष सी. पी. त्रिपाठी यांनी यावेळी दिली.

    लस पूर्णपणे सुरक्षित – जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

    लस घेतल्यानंतर कोरोनाच्या आजारातून लवकर बरे होता येते, लसीचे कवच कुंडल असेल तर कोरोना झाला तरी सुरक्षित यावर मात करू शकाल असे स्पष्ट करीत लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्तपणे साथ देवून नागरिकांनी लसीकरण करून घ्या असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी याप्रसंगी केले. यावेळी जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या वयोवृद्ध आई वडिलांचे उदाहरण देवून कोरोना लसीचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले.