लॉकडाऊनमुळे बजाज ऑटो आणि स्कोडाच्या उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता

  • औरंगाबाद शहर १० ते १८ जुलैदरम्यान लॉकडाऊन करण्याचा आदेश जारी करण्यात आले आहेत
  • बजाज ऑटो आणि स्कोडा यांसारख्या वाहन कंपन्यांवर परिणाम होण्याची शक्यता आहे
  • बजाज ऑटो कंपनीमधील अडीचशेपेक्षा जास्त कामगारांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे

औरंगाबाद – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे देशांतील अनेक कंपन्या, कारखाने, आणि दुकाने या सर्व गोष्टी अजूनही ठप्प आहेत. त्यामुळे देशात बेरोजगारीची संधी निर्माण झाली आहे. तसेच कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे औरंगाबाद येथील प्रशासनाने लॉकडाऊनचा करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुंबई, ठाणे, आणि पुणे या शहरानंतर आता औरंगाबाद शहर १० ते १८ जुलैदरम्यान लॉकडाऊन करण्याचा आदेश जारी करण्यात आले आहेत. परंतु लॉकडाऊनमुळे औरंगाबाद परिसरातील बजाज ऑटो आणि स्कोडा यांसारख्या वाहन कंपन्यांवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. औरंगाबाद शहरात बजाज ऑटो आणि स्कोडा यांसारख्या वाहन कंपन्याचे उत्पादन होते.

तसेच या दोन्ही वाहन कंपन्यांमध्ये अधिक प्रमाणात कामगार आहेत. परंतु बजाज ऑटो कंपनीमधील अडीचशेपेक्षा जास्त कामगारांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे. त्याचबरोबर काही कामगारांचा मृत्यू देखील झाला आहे. त्यामुळे या वाहन कंपन्यांमधील कामगार संघटनांनी काम बंद ठेवण्याची मागणी देखील केली होती. परंतु आता संपूर्ण शहरचं लॉकडाऊन करण्यात येणार असून, या कंपन्यांना सुटे भाग पुरविणाऱ्या कंपन्यांच्या कामकाजावर याचा परिणाम होण्याची शक्ययता आहे.