अतिवृष्टीने शेतजमिनीही खरडल्या; मराठवाड्यात तब्बल 4 हजार कोटींचं नुकसान तर 38 लाख हेक्टरवरील पीक पाण्यात

अजित पवार यांनी मराठवाड्यात अंदाजे 4 हजार कोटींचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. 48 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 35 ते 38 लाख हेक्टर क्षेत्राचं नुकसान झालं आहे. एनडीआरएफच्या नाॅर्मनुसार 4 हजार कोटींचं नुकसान झालं आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

    औरंगाबाद : कायम दुष्काळानं होरपळणाऱ्या मराठवाड्याला यंदा पावसानं झोडपलं आहे. पावसानं मराठवाड्यातील शेतीचं प्रचंड नुकसान केलं आहे. सतत पडणाऱ्या पावसानं मराठवाड्यातील काढणीला आलेली सर्व पिकं उद्धवस्त झाली आहेत. जिकडं बघावं तिकडं रस्त्यांची, पुलांची, शेतीची वाईट अवस्था दिसत आहे.

    दरम्यान अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मराठवाड्यातील नुकसानीचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. अजित पवार यांनी मराठवाड्यात अंदाजे 4 हजार कोटींचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. 48 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 35 ते 38 लाख हेक्टर क्षेत्राचं नुकसान झालं आहे. एनडीआरएफच्या नाॅर्मनुसार 4 हजार कोटींचं नुकसान झालं आहे, असं अजित पवार यांनी सांगितलं आहे.

    त्यामुळे मराठवाड्यात जवळजवळ 80 टक्के शेतीपिकांचे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. वेळी कर्ज काढू पण मराठवाड्यातील आणि महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे. मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी मांडली आहे. यावर बोलताना पवार म्हणाले की, ओला दुष्काळ जाहीर करण्याचा निर्णय हा मुख्यमंत्री स्तरावर होणार आहे.

    दरम्यान, मराठवाड्याला यंदाच्या वर्षी पावसाने जोरदार झोडपलं होत. मराठवाड्यातील शेतकऱ्यांचं शेतीसोबतच घरांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. राज्य सरकारच्या मदतीची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे आता सरकार यावर काय भूमिका घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.