महाराष्ट्र कोरोनाशी जिद्दीने लढत आहे : आदित्य ठाकरे, व्यास कुटुंबियांचे कौतुक करत, कोविड सेंटरला दिल्या शुभेच्छा

गजानन मंदिर परिसर, गारखेडा येथे सुरू झालेला हा उपक्रम जागृत हनुमान संस्थान व दक्षिन केसरी मुनी मिश्रिलालजी महाराज हॉस्पिटल (डिकेएमएम) सयुंक्तपणे मोफत असणार आहे. जागृत हनुमान ट्रस्टचे अध्यक्ष व उद्योजक सतीश व्यास यांनी गारखेडा भागात असलेल्या डिकेएमएम संस्थेचे हॉस्पिटल दत्तक घेतले आहे. कोरोनाच्या काळात आरोग्य यंत्रणेला मदत व्हावी, व गरजूंना मोफत उपचार मिळावा, हा शुद्ध हेतूने कल्पना आल्यानंतर त्यांनी पुढाकार घेतला.

    औरंगाबाद : महाराष्ट्र गेल्या मार्चपासून कोरोनाशी झुंझत आहे, त्यावर मात करण्यासाठी जिद्दीने लढा देत आहे. या लढ्यात राज्य सरकार व प्रशासन सेवा देत असताना अनेक ठिकाणी व्यास कुटुंबासारखे अनेक जण लढ्यात सहभागी होत आहेत. हे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन युवासेनाप्रमुख तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले तसेच औरंगाबाद मध्ये सुरू होणाऱ्या कोविड सेंटरला शुभेच्छा दिल्या.

    गजानन मंदिर परिसर, गारखेडा येथे सुरू झालेला हा उपक्रम जागृत हनुमान संस्थान व दक्षिन केसरी मुनी मिश्रिलालजी महाराज हॉस्पिटल (डिकेएमएम) सयुंक्तपणे मोफत असणार आहे. जागृत हनुमान ट्रस्टचे अध्यक्ष व उद्योजक सतीश व्यास यांनी गारखेडा भागात असलेल्या डिकेएमएम संस्थेचे हॉस्पिटल दत्तक घेतले आहे. कोरोनाच्या काळात आरोग्य यंत्रणेला मदत व्हावी, व गरजूंना मोफत उपचार मिळावा, हा शुद्ध हेतूने कल्पना आल्यानंतर त्यांनी पुढाकार घेतला.

    या रुग्णालयात ०६ ऑक्सिजन बेड असून, ०१ एमडी डॉक्टर, २ डॉक्टर, ६ नर्स व इतर स्टाफ उपलब्ध केले असून गरजेप्रमाणे वाढ करण्यात येणार आहे. येथे येणाऱ्या सर्व रुग्णांची व नागरिकांची सतीश व्यास यांच्या वतीने चहा, नाश्ता, जेवण, दैनंदिन गरजेच्या वस्तू, उपचार मोफत देण्यात येईल. असे आवाहन सतीश व्यास, ताराचंदजी दुगर (चैन्नई), दीपक व्यास, दिलिप खिवंसरा, पप्पु व्यास,प्रवीण छाजेड, मिथुन व्यास सूनिल रितेश व्यास प्रिन्सिपॉल डॉ. फुरकान रोहित अहुजा, केतन साहुजी, नितीन राठी यांनी केले आहे.

    आपत्कालीन संपर्कसाठी युवासेना चिटणीस मिथुन व्यास ( ९८२३३१०५७० ) व दिलीप खिंवसरा ( ७५०७०३२५३३ ) या क्रमांकवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी जिल्हा अधिकारी सुनील चव्हाण, मनपा प्रशासक अस्तिककुमार पांडेय, पोलीस आयुक्त निखिल गुप्ता, सर्व आरोग्य अधिकारी आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

    यावेळी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे, आमदार प्रदीप जैस्वाल, सहसंपर्कप्रमुख त्रिंबक तुपे, भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष संजय केनेकर, युवासेना उपसचिव राजेंद्र जंजाळ, ऋषिकेश खैरे, विधानसभा संघटक राजू वैद्य, बप्पा दळवी, युवासेना चिटणीस किरण तुपे, माजी नगरसेवक मकरंद कुलकर्णी, लक्ष्मीनारायण बाखरिया आदींनी सेंटरला भेट देऊन शुभेच्छा दिल्या.