तरुणाने कोरोनाची लागण झाल्याने घेतली सुट्टी, कंपनीने मग कामावरूनच काढलं म्हणून नैराश्यात गेला अन्…..

कोरोना विषाणूची लागण (Corona infection) झाल्यानंतर उपचारासाठी काही दिवस रजा (take leave) घेतल्यानं एका व्यक्तीला थेट नोकरीवरून काढून टाकल्याची (Company Fired) धक्कादायक घटना समोर आली आहे.

    औरंगाबाद: कोरोना विषाणूची लागण (Corona infection) झाल्यानंतर उपचारासाठी काही दिवस रजा (take leave) घेतल्यानं एका व्यक्तीला थेट नोकरीवरून काढून टाकल्याची (Company Fired) धक्कादायक घटना समोर आली आहे.

    कोरोनाकाळात कामावरून कमी केल्यानं नैराश्य आल्यानं संबंधित व्यक्तीनं आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. आत्महत्या केल्याची घटना समोर येताच, कुटुंबांनी एकच टाहो फोडला आहे. कुटुंबाच्या आक्रोशानं गावातही शोककळा पसरली होती. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

    प्रदीप  भाकरवाल असं आत्महत्या केलेल्या या व्यक्तीचं नाव आहे. मृत भाकरवाल हे आपली पत्नी आणि दोन मुलांसह एम-टू मध्ये राहत होते. गुरुवारी सायंकाळी त्यांनी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्याचा शेवट केला आहे. मृत भाकरवाल यांना मार्च महिन्यात कोरोना विषाणूची लागण झाली होती. त्यामुळे उपचार घेण्यासाठी त्यांना काही दिवस कामातून रजा घ्यावी लागली होती. त्यांनी रजा घेतल्यानं कंपनीनं त्यांना कामावरूनच काढून टाकलं होतं. त्यामुळे ते मागील काही महिन्यांपासून तणावात होते.

    गुरुवारी दुपारी मृत भाकरवाल यांनी आपली दोन मुलं आणि पत्नीसोबत जेवण केलं. यानंतर ते आपल्या घरातील मागील खोलीत गेले. तर पत्नी समोरच्या खोलीतच होत्या.

    नेहमीप्रमाणे प्रदीप झोपले असतील, या विचारानं पत्नीनं त्यांना आवाज दिला नाही. पण रात्री नऊच्या सुमारास मृत भाकरवाल यांचा मुलगा रात्रीच्या जेवणासाठी त्यांना उठवायला गेला. पण रुममधून काहीही प्रतिसाद आला नाही.त्यामुळे मुलानं खिडकीतून डोकावलं आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. गळफास घेतलेल्या अवस्थेत वडिलांचा मृतदेह पाहून त्याला धक्काच बसला आणि काय कारवं हेही सुचलं नाही. यानंतर घरच्या सदस्यांनी दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला. मृत प्रदीप यांनी नोकरी गेल्यानं नैराश्यातून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज लावला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.