मराठा आरक्षण; सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल

मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केले आहे. न्यायालयात कुणी आरक्षणाविषयी याचिका केल्यास आमचे म्हणणेही ऐकावे म्हणून हे कॅव्हेट दाखल केल्याचे पाटील म्हणाले. लोकसभेत कायदा करण्यात आल्यानंतर, 105 वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर आरक्षण देण्याचे अधिकार राज्य सरकारला मिळाले आहेत.

    औरंगाबाद : मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केले आहे. न्यायालयात कुणी आरक्षणाविषयी याचिका केल्यास आमचे म्हणणेही ऐकावे म्हणून हे कॅव्हेट दाखल केल्याचे पाटील म्हणाले. लोकसभेत कायदा करण्यात आल्यानंतर, 105 वी घटना दुरुस्ती झाल्यानंतर आरक्षण देण्याचे अधिकार राज्य सरकारला मिळाले आहेत.

    मात्र या निर्णयाला कुणी कोर्टात आव्हान देऊ नये म्हणून पाटील यांनी सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केले आहे. मराठा आरक्षणाविषयी काही निर्णय होणार असल्यास अनेक लोक याला विरोध करण्यासाठी कोर्टात जातात. मात्र हे होऊ नये आणि न्यायालयाने आधी आमचं ऐकावं म्हणून हे कॅव्हेट दाखल केल्याचे पाटील म्हणाले.

    read_also content=”मुंबईतील कोरोना घालविण्यासाठी BMC चा जबरदस्त प्लान; नागरिकांचा बॉडी मास इंडेक्स तपासला जाणार~https://www.navarashtra.com/mumbai-news-marathi/corporation-to-conduct-survey-of-non-communicable-diseases-in-mumbai-citizens-body-mass-index-will-be-checked-nrvk-171732/”]