Live in Relationship Now what is the court order; Then, even parents cannot prevent 'them' from living together

कराटे (karate teacher`s Affair With  Minor Girl) शिकवणाऱ्या एका ४१ वर्षांच्या शिक्षकानं एका मुलीसोबत प्रेम प्रकरण(Teacher Student Relationship) केल्याची घटना समोर आली आहे.

    औरंगाबाद : लॉकडाऊनमध्ये घरी जाऊन कराटे (karate teacher`s Affair With  Minor Girl) शिकवणाऱ्या एका ४१ वर्षांच्या शिक्षकानं एका मुलीसोबत प्रेम प्रकरण(Teacher Student Relationship) केल्याची घटना समोर आली आहे. ती मुलगी अठरा वर्षांची होताचं, सज्ञान झाल्याचा आधार घेत कराटे शिक्षक तिला आपल्या घरी घेऊन गेला आहे.

    हा प्रकार उघडकीस आल्यानंतर मुलीच्या कुटुंबियांनी कराटे शिक्षकाच्या घरी जाऊन तिला परत आणण्याचा प्रयत्न केला. पण मुलीनेच घरी येण्यास नकार दिल्यानं कुटुंबीय तोंडघशी पडले आहेत. यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत दोन्ही कुटुंबांतील तणाव शांत केला आहे.

    संबंधित मुलगी ही पुंडलिकनगर येथील रहिवासी असून ती बीए प्रथम वर्षाची विद्यार्थिनी आहे. ही मुलगी गेल्या काही महिन्यांपासून ४१ वर्षीय कराटे शिक्षकाकडे कराटे शिकण्यासाठी जात होती. दरम्यान दोघांमध्ये जवळीक निर्माण झाली. यानंतर कराटे शिक्षक राजूनं लॉकडाऊनच्या काळात मुलीला घरी जाऊन प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. कालांतरानं त्यांच्यातील मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. पण मुलगी अल्पवयीन असल्यानं कराटे शिक्षक शांत होता. मात्र बुधवारी तिचा अठरावा वाढदिवस होताच, गुरुवारी १ जुलैला तो तिला आपल्या घरी घेऊन गेला.

    हा सगळा प्रकार समजताच कुटुबियांना धक्काच बसला. विशेष म्हणजे संबंधित कराटे शिक्षक मुलीच्या घरी नेहमी ये-जा करत असायचा. त्यामुळे त्याचे मुलीच्या घरच्यांसोबत चांगले संबंध होते. तो संबंधित मुलीला आपली भाची मानायचा. पण संधी मिळताचं त्यानं डाव साधला. धक्कादायक बाब म्हणजे आरोपी कराटे शिक्षकाचे यापूर्वी २ विवाह झाले आहेत. त्याला दुसऱ्या बायकोपासून तेरा आणि सोळा वर्षांच्या २ मुलीही आहेत.

    मुलीचे कुटुंबीय जेव्हा शिक्षकाच्या घरी पोहचले, तेव्हा संबंधित मुलीनं घरी परत यायला नकार दिला. यामुळे दोन्ही कुटुंबियांत तणाव वाढत गेला. यानंतर संबंधित मुलीनेच पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली. पोलिसांनी दोन्ही कुटुंबांना पोलीस ठाण्यात नेऊन समजावण्याचा प्रयत्न केला. पण मुलीनं कोणाचंही ऐकलं नाही. त्यामुळे पोलिसांनी मुलीच्या कुटुंबियांची समजूत काढली. तसेच कराटे शिक्षकाच्या दुसऱ्या पत्नीला देखील याचा काहीही प्रॉब्लेम नव्हता. त्यामुळे संबंधित मुलगी पुन्हा कराटे शिक्षकाच्या घरी राहायला गेली आहे.