medical equipment handed

मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी जून २०२० मध्ये १० लाखाचा आमदार निधी दिला होता. या आमदार निधीतून खरेदी करण्यात आलेली यंत्रसामुग्री मा.आ.सतीश चव्हाण (MLA Satish Chavan) यांच्या हस्ते सदरील विभागास सुर्पूद (handed over) करण्यात आली.

औरंगाबाद : औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील (घाटी) नवजात शिशु विभागात (child care department) कोरोनाग्रस्त नवजात शिशु रूग्णांकरिता वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी (Medical equipment) मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी जून २०२० मध्ये रू.१० लाखाचा आमदार निधी दिला होता. या आमदार निधीतून खरेदी करण्यात आलेली यंत्रसामुग्री मा.आ.सतीश चव्हाण (MLA Satish Chavan) यांच्या हस्ते सदरील विभागास सुर्पूद (handed over) करण्यात आली.

यावेळी घाटीच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर, सुपर स्पेशालिटी ब्लॉकचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ.सुधीर चौधरी, नवजात शिशु विभागाचे विभाग प्रमुख डॉ.एल.एस.देशमुख, वैद्यकीय अधिक्षक डॉ.सुरेश हरबडे, डॉ.विमल केदार, डॉ.अमोल जोशी, डॉ.अतुल लोंढे आदींची उपस्थिती होती. कोविड-१९ विषाणुमुळे उद्‌भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंधक व नियंत्रण करण्यासाठी तसेच जिल्हापातळीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या कार्यवाहीला बळ देण्यासाठी राज्य शासनाने २७ मार्च २०२० रोजी एक वेळची विशेष बाब म्हणून वैद्यकीय यंत्रसामुग्री व साहित्य खरेदी करण्यासाठी विधीमंडळ सदस्यांना प्रत्येकी ५० लाखाचा निधी उपलब्ध देण्याचा निर्णय घेतला होता. मा.आ.सतीश चव्हाण यांचा मतदारसंघ हा संपूर्ण मराठवाडा असल्याने कोविड-१९ च्या अनुषंगाने उपलब्ध करून दिलेला निधी त्यांनी मराठवाड्यातील विविध शासकीय रूग्णालयांना यंत्रसामुग्री व साहित्य खरेदीसाठी देण्यात आला.

औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयातील (घाटी) नवजात शिशु विभागात मा.आ.सतीश चव्हाण यांच्या आमदार निधीतून याठिकाणी बेबी ट्रॉली, ट्रान्सपोर्ट इन्क्युबेटर, रेडीयंट वार्मर, पल्स ऑक्सीमीटर, सिरींग पंप, फोटो थेरपी, पोर्टेबल सक्शन, इन्फ्रा रेड थर्मामीटर, डिजिटल इन्फांट वेविंग स्केल, सेल्फ इन्फ्लेटिंग बॅग, लायरनगोस्कोप, ऑक्सिजन हूड आदी यंत्रसामुग्री व साहित्य देण्यात आले. सदरील यंत्रसामुग्री व साहित्यामुळे याठिकाणी नवजात शिशुंवर योग्य उपचार होण्यास मदत होईल असे मा.आ.सतीश चव्हाण यांनी यावेळी सांगितले.