स्ट्रीट्स फॉर पीपल चॅलेंजसाठी व्यापाऱ्यांचा पुढाकार

औरंगाबाद : केंद्रीय शहरी विकास खात्यांतर्गतच्या दी इंडिया स्मार्ट सिटी मिशन यांनी राष्ट्रीय स्तरावर ‘स्ट्रिटस् फॉर पिपल’ योजनेत औरंगाबाद महानगरपालिकेने सहभाग नोंदविला असून शहरातील रस्त्यांचा आर्थिकदृष्ट्या विकास, नागरिकांची सुरक्षा आणि लहान मुला-मुलींसाठी मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करण्यात येणार आहे. स्ट्रीटस् फॉर पीपल चॅलेंजमध्ये सहभाग नोंदविण्यासाठी टिळक पथच्या व्यापाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लिमिटेड (एएससीडीसीएल) बरोबर काम करण्याचे व्यापाऱ्यांनी मान्य केले असून पैठणगेट ते गुलमंंडी (मॅचवेल) दरम्यानचा मार्गाचा विकास करण्यात येणार आहे.

एएससीडीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या नेतृत्वात एएससीडीसीएलने स्ट्रीटस् फॉर पीपल्स चॅलेंजसाठी तीन जागांपैकी पैठणगेट ते गुलमंडी ही एक साइट निवडली आहे. आव्हानाचा एक भाग म्हणून एएससीडीसीएल पार्किंग सुव्यवस्थीत, फेरीवाल्यांचे आयोजन करण्यासाठी, वाहन वाहतुकीचे नियमन व विकासात्मक कामे नियमित करून या रस्ता अधिक प्रशस्त, हरित, सुंदर आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवत आहे. एएससीडीसीएलचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण शिंदे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर औरंगाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांसमवेत टिळक पथ येथे दुकानदारांची बैठक घेतली. यावेळी सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक स्नेहा मोहन नायर, स्नेहा बक्षी, अर्पिता शरद, अभिलाषा अग्रवाल, युसुफ मुकाती, दिलीप चोटलानी, भरत शहा, रवी पारसवानी, आनंद परसवानी, काळदा जी, हरविंदरसिंग सलूजा, एससी झहीर आणि गुड्डू जी, शिक्षणतज्ज्ञ नदीम पाशा आणि त्यांची टीम उपस्थित होते. तत्पूर्वी वाहतुक शाखेचे एसीपी सुरेश वानखेडे, ट्रॅफीक पीआय एम. देशमुख यांनी पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापाऱ्यांशी सर्वेक्षणाबद्दल चर्चा केली.

व्यापाऱ्यांनी मांडल्या समस्या

रस्त्यावर प्रचंड गर्दी, अव्यवस्थित फेरीवाले आणि रस्त्यांच्या पायाभूत सुविधांची गरज याविषयी व्यापाऱ्यांनी समस्या मांडल्या. स्मार्ट सिटी टीम स्ट्रीटस् फॉर पीपल्सच्या माध्यमातून विकास करत असल्यास सहकार्य करण्यास तयार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी एएससीडीसीएलवर विश्वास व्यक्त केला. शहर सुधारण्यासाठी लोकांना अधिक शिस्तबध्द होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तर विकासाच्या प्रत्येक टप्प्यात सर्वांना विश्वासात तसेच सल्ला घेतला जाणार असल्याचे एएससीडीसीएलच्या स्नेहा मोहन यांनी सांगितले.