महिलेला रिक्षातून उतरवत छेडछाड, कपडेही फाडले; औरंगाबादच्या वाळूज परिसरातील धक्कादायक घटना

आज शनिवारी ती महिला सकाळी ऑटोतून जात असताना संबंधित व्यक्तीने तिचे कपडे फाडले आणि अंगावरील दागिनेही हिसकावून घेतले. सदर व्यक्तीने पीडितेच्या खांद्याला चावा घेतला.

    औरंगाबाद (Aurangabad) : धावत्या ऑटोत महिलेची छेडखानी (A man molested a woman in Auto Riksha) करत एका व्यक्तीने तिचे कपडे फाडले. एवढेच काय तर आरोपी व्यक्तीने (the accused) तिचे दागिनेही हिसकावून घेतले (snatch jewelery); दरम्यान झालेल्या झटापटीत महिला (The woman) जखमी झाली (injured in the clash). औरंगाबाद शहरात आज सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास वाळूज परिसरात (Waluj area of ​​Aurangabad) ही धक्कादायक घटना घडली.

    महिलेने सांगितल्यानुसार, ती विवाहित असून ऑटोतून प्रवास करीत होती. या दरम्यान तिच्या ओळखीच्या गवळी नामक व्यक्तीने तिची छेडखानी केली. सदर व्यक्ती मागील अनेक वर्षांपासून महिलेवर एकतर्फी प्रेम करतोय. आज शनिवारी ती महिला सकाळी ऑटोतून जात असताना संबंधित व्यक्तीने तिचे कपडे फाडले आणि अंगावरील दागिनेही हिसकावून घेतले. सदर व्यक्तीने पीडितेच्या खांद्याला चावा घेतला. या दरम्यान महिलेच्या डोक्यालाही इजा झाली.

    अखेर सुज्ञ नागरिकांनी पीडित महिलेला कपडे देत मदत तिची मदत केली. काही नागरिकांनी पोलिसांना याची माहिती देताच पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचली. पोलिसांनी महिलेची विचारपूस करून घटनाक्रम जाणून घेतला. तुर्तास महिलेली पोलिसांत गुन्हा दाखल केल्याबाबत वृत्त आलेले नाही; मात्र पोलिस घटनेतील संबंधित व्यक्तीचा शोध घेत आहे.