woman cartoon

औरंगाबादमध्ये सासूबाईनं आपल्या सुनेचं डोकं फोडल्याची (Mother In Law Beat Daughter In Law) घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी सिडको परिसरातील त्रिवेणीनगरात घडली आहे. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात सासूबाई विरोधात गुन्हा दाखल (Aurangabad Cidco Police) करण्यात आला आहे.

    औरंगाबाद : आजकाल रागाच्या भरात कोण काय करेल याचा काही नेम नाही. औरंगाबादमध्ये सासूबाईनं आपल्या सुनेचं डोकं फोडल्याची (Mother In Law Beat Daughter In Law) घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी सिडको परिसरातील त्रिवेणीनगरात घडली आहे. याप्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात सासूबाई विरोधात गुन्हा दाखल (Aurangabad Cidco Police) करण्यात आला आहे. एका छोट्या कारणामुळे सासूबाईनं सुनबाईला दिलेल्या शिक्षेमुळे(Punishment) परिसरात खळबळ उडाली आहे.

    फिर्यादी सुनेची २२ ऑगस्टला तब्येत बिघडली. त्यामुळे ती सासूला न विचारता, आंबेडकरनगर येथे आपल्या माहेरी गेली. सुनबाई न विचारता माहेरी गेल्यामुळे सासुबाईंचा स्वाभिमान दुखावला. त्यामुळे सुनेबद्दल त्यांच्या मनात राग होता. दरम्यान रविवारी फिर्यादी महिला सासरी परत आली. यावेळी सासूनं ‘मला न विचारता तू माहेरी का गेलीस?’ असं विचारत वाद सुरु केला. वाद वाढल्यावर सासूने आपल्या सुनेला शिवीगाळ करत मारहाण केली. तेव्हा सुनेचं डोकं फुटलं आहे. या घटनेनंतर जखमी सुनेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.