खा. डॉ.भागवत कराड यांनी अर्थ राज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला

डॉ. भागवत कराड हे वैद्यकीय क्षेत्रातील उच्च विद्याविभूषित सर्जन असून गेल्या वर्षी राज्यसभेवर त्यांची नियुक्ती झालेली आहे. त्यांची शैक्षणिक बाजू महत्वपूर्ण जमेची असल्याने त्यांना अर्थ राज्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी निवड केली आहे.

  औरंगाबाद : खासदार डॉ. भागवत कराड यांनी ०७ जुलै रोजी केंद्रीय अर्थ राज्य मंत्री पदाची शपथ घेतली, त्यानंतर आज दिनांक ८ रोजी दुपारी ०१.३२ मिनिटांनी दिल्लीतील अत्यंत मानाचे स्थान असलेल्या नोर्थ ब्लॉक मधील अर्थ मंत्रालयात जाऊन त्यांनी पदभार स्वीकारला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कॅबिनेट विस्तारामध्ये  मराठवाड्याच्या वाट्याला अत्यंत महत्त्वपूर्ण असलेले अर्थ मंत्रालय मिळालेले आहे. खासदार डॉ. भागवत कराड यांची अर्थ राज्यमंत्री पदी निवड करण्यात आलेली आहे.

  दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार, खासदार डॉ. भागवत कराड यांनी ठीक एक वाजून बत्तीस मिनिटांनी नोर्थ ब्लॉक मध्ये जाऊन अर्थखात्याचा पदभार स्वीकारला. त्यावेळी अर्थ मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंत्री महोदय डॉ.भागवत कराड यांना अर्थ मंत्रालयातील दैनंदिन कामकाजाबद्दल सविस्तरपणे माहिती दिली.

  या मंत्रालयात असलेले महत्त्वपूर्ण विभाग आणि त्या अंतर्गत असलेल्या योजना व त्याची अंमलबजावणी याचीही माहिती यावेळी देण्यात आली. अर्थ मंत्रालयातील विविध विभाग याची सविस्तर माहिती त्यांनी घेतली. यामध्ये अर्थ मंत्रालय असलेले वेगवेगळे विभाग प्रामुख्याने आर्थिक कार्य विभाग,  राजस्व, निर्गुंतवणूक, विमा आणि बँकिंग क्षेत्रातील महत्वपूर्ण माहिती त्यांनी जाणून घेतली यावेळी त्या विभागाचे वरिष्ठ सचिव आणि अधिकारी वर्ग उपस्थित होता.

  डॉ. भागवत कराड हे वैद्यकीय क्षेत्रातील उच्च विद्याविभूषित सर्जन असून गेल्या वर्षी राज्यसभेवर त्यांची नियुक्ती झालेली आहे. त्यांची शैक्षणिक बाजू महत्वपूर्ण जमेची असल्याने त्यांना अर्थ राज्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी निवड केली आहे.

  सध्या देशातील अर्थव्यवस्थेत वेगाने सुधारणा होत असून आगामी काळात विकास दरही वाढणार आहे. अर्थव्यवस्थेतील सुधारणा, विकास दर आणि त्यातील बारकावे त्यांनी व्यवस्थितपणे समजून घेतले.

  मराठवाडा हा मागास भाग असल्याने त्या ठिकाणी पायाभूत सुविधा आणि मानव विकास निर्देशांक यामध्ये मोठे काम आता डॉक्टर भागवत कराड यांच्या रूपाने होणार आहे अशी लोकांची प्रचंड इच्छाशक्ती आहे. औरंगाबादला अद्यापपर्यंत केंद्रीय मंत्री पदी स्थान मिळालेले नव्हते. त्यामुळे औरंगाबाद आणि मराठवाड्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध असल्याचे डॉक्टर भागवत कराड यांनी यावेळी म्हटले आहे. नागरिकांच्या देखील त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.

  MP Dr Bhagwat Karad accepted the post of Minister of State for Finance