
भारतात महारष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील एका महिलेला कोरोनावर मात केल्यानंतर काही दिवसांनी कंबरदूखीचा त्रास झाला. पहिले किरकोळ दुखणे समजून त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु अती वेदना सुरु झाल्याने डॉक्टरांनी तिला एमआरआय रिपोर्ट काढण्याचा सल्ला दिला.
औरंगाबाद : जगभरात कोरोनाने (corona) थैमान घातले आहे. आता कोरोना प्रकरणे मंदावत असतानाच युरोपात कोरोनाच्या नव्या रुपाने धुमाकूळ घातली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वच देशांच्या चिंतेत वाढ झाली आहे. कोरोनावर मात केल्यानंतर परदेशात काही रुग्णांच्या अंगात पू झाल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यामुळे अनेक रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. तर काही रुग्णांवर उपचार करण्यात आला आहे. अशीच एक घटना भारतात घडल्याचे उघडकीस आली आहे. आतापर्यंत भारतात अंगात पू झाल्याची पहिलीच केस समोर आली आहे.
भारतात महारष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील एका महिलेला कोरोनावर मात केल्यानंतर काही दिवसांनी कंबरदूखीचा त्रास झाला. पहिले किरकोळ दुखणे समजून त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु अती वेदना सुरु झाल्याने डॉक्टरांनी तिला एमआरआय (MRI )रिपोर्ट काढण्याचा सल्ला दिला. महिलेला कोरोना झाल्याचे कळाले नाही. परंतु डॉक्टरांनी काढलेल्या कोरोना अहवालातून तिला कोरोना होऊन गेल्याचे आढळले. तसेच रिपोर्ट नेगेटिव्ह असून शरिरात अँटिबॉडी तयार झाल्या आहेत.
दरम्यान महिला कंबर दुखीच्या त्रासाने व्याकुळ झाली होती. वारंवार उपचार घेऊनही तिचे दुखणे कमी होत नव्हते. त्यामुळे डॉक्टरांनी एमआरआय रिपोर्ट काढण्यास सांगितले. या MRI रिपोर्टममधून धक्कादायक बाब समोर आली. रिपोर्ट पाहिल्यावर समजले की महिलेच्या संपूर्ण शरीरात पू झाला आहे. यामुळेच कंबरदुखीचा त्रास जाणवत आहे.
महिलेवर डॉक्टरांनी तीन वेळा शस्त्रक्रिया करुन या महिलेच्या शरीरातील पू काढला आहे. यशस्विरीत्या उपचार करुन तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. अशा प्रकारची घटना भारतात पहिल्यांदाच सापडली आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. कोरोनावर मात केल्यानंतर अशा प्रकारचा आजार होत असल्याचा परिणाम धक्कादायक आहे.