नागरिक, स्वयंसेवी संस्था, संघटनांना सोबत घेऊन मनपा प्रशासक पाण्डेय यांनी उचलले पाच टन प्लास्टिक

खाम नदी (the Kham River) पुनरुज्जीवन विकास प्रकल्पाच्या (Revitalization Development Project) कामाला गती आली आहे. दरम्यान महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक (Municipal Commissioner and Administrator) आस्तिक कुमार पाण्डेय (Astik Kumar Pandey) यांनी मोहिमेत सहभागी स्वयंसेवी संस्था...

  औरंगाबाद (Aurangabad). खाम नदी (the Kham River) पुनरुज्जीवन विकास प्रकल्पाच्या (Revitalization Development Project) कामाला गती आली आहे. दरम्यान महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक (Municipal Commissioner and Administrator) आस्तिक कुमार पाण्डेय (Astik Kumar Pandey) यांनी मोहिमेत सहभागी स्वयंसेवी संस्था, संघटना व दोनशे नागरिकांना, युवक-युवतींना सोबत घेऊन कोरोना नियमाचे पालन करत आज शनिवारी खाम नदीवर पाच टन प्लास्टिक उचलून वृक्षारोपण केले. तसेच नदीच्या सौंदर्यीकरण, पर्यावरण व पर्यटनाच्या दृष्टीने सौर ऊर्जा, खेळाच्या मैदानावरील पावसाच्या पाण्याची व्यवस्था , महिला व पुरुषांसाठी स्वच्छता गृहाच्या जागांचे नियोजन केले.

  खाम नदी पुनरुज्जीवन विकास प्रकल्पाचे काम माझी वसुंधरा अभियानाअंतर्गत गेल्या सहा महिन्यापासून दर शनिवारी महानगरपालिका, स्मार्ट सिटी, सी आय आय,छावणी परिषद, व्हॅरॅक, ईको सत्व, स्वयंसेवी संस्था, संघटनांच्या अनुभवी व्यक्तींना , नागरिकांनासोबत घेऊन लोकसहभागातून काम केले जात आहे.

  आज शनिवारी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांनी खामनदीला भेट देऊन कामाची पाहणी केली. घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे, विद्युत विभागाचे कार्यकारी अभियंता ए. बी. देशमुख, मोहिनी गायकवाड, जिल्हा उत्खनन अधिकारी डॉ. अतुल दोड, इकोसत्त्वाच्या नताशा झरीन, स्मार्ट सिटी चे गौरी मिराशी, आदित्य तिवारी आणि सिद्धार्थ जाधव , वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक असदुल्ला खान यांच्याकडून साप्ताहिक स्वच्छता, वृक्षारोपण, आढावा घेतला.या पुढील विकास कामाबाबत चर्चा करून करण्यात येणाऱ्या विविध कामांचे नियोजन केले. यावेळी प्रशासक पाण्डेय यांनी लोखंडी पुल ते गरम पाणी पर्यंत झालेल्या खाम नदीवरील कामाची पाहणी केली. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने नदीच्या कुठल्याही कामाचे नुकसान झाले नसल्याचे दिसून आले.कामाच्या मजबूतीबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.

  उड्डायन शालिनी फाऊंडेशनच्या युवतींनी व अ‍ॅनिमल वेलफेअर स्वयंसेवकांनी व दोनशे नागरिकांनी स्वच्छता मोहिमेत सहभागी होऊन प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्यासोबत नदीच्या काठावरील पाच टन प्लास्टिक उचलून स्वच्छता व वृक्षरोपण केले. आयुक्तांनी कचरा उचलण्याच्या ‘युनाइटेड अँड कॉन्कर’ पध्दतीने सर्व स्वयंसेवकांची साखळी बनवून प्रशिक्षण दिले. यावेळी स्वयंसेवकांपैकी जया युवती म्हणाली की, “नगरसेवक, महानगरपालिका आयुक्त, स्वयंसेवकांसह नदीकाठावर प्लास्टिक उचलत आहेत हे पाहून मला धक्का बसला! सर्वात कुशलतेने काम कसे करावे हे देखील त्यांनी आम्हाला सांगितले!”

  महानगरपालिका आयुक्त पाण्डेय यांना कामाचा आढावा घेतला आणि घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नंदकिशोर भोंबे, विद्युत विभागाचे ए बी देशमुख, गौरी मिराशी व नताशा झरीनसह खाम नदीच्या पथकासह सार्वजनिक स्वच्छतागृहे, प्रकाश योजना, पेव्हर-ब्लॉक्सचा पुनर्वापर आणि पावसाच्या पाण्याचे व्यवस्थापन यासाठी जागांची व्यवस्था केली.

  आयुक्त पाण्डेय म्हणाले की, “आम्ही हे शक्य तेवढे टिकाव व मजबूत करू, सोलर लायटिंगचा वापर करू, जेथे आवश्यक असेल तेथे जुने पेव्हर-ब्लॉक्सचा पुन्हा वापर करू,तसेच नैसर्गिक पर्यावरणीय वृक्षारोपण केले जाईल. जैवविविधतेसाठी आणि लोकांसाठी चांगली रमनीय जागा तयार करू.असे त्यांनी सांगितले.