औरंगाबाद | विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा डंका, भाजपला मोठा झटका, या क्षणाचे अपडेट्स (LIVE) | Navarashtra (नवराष्ट्र)
ट्रेंडिंग टॉपिक्स
ब्रैकिंग न्यूज़
लाईव ब्लॉग
अंतिम अपडेटDecember, 04 2020

विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचा डंका, भाजपला मोठा झटका, या क्षणाचे अपडेट्स (LIVE)

द्वारा- Amol Joshi
कंटेन्ट रायटर
10:47 AMDec 04, 2020

या क्षणाचे अपडेट्स

या क्षणाचे अपडेट्स

-    पुणे पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अरुण लाड विजयी

-    औरंगाबादमधून महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण विजयी

-    धुळे नंदुरबारमधून भाजपचे अंबरीश पटेल विजयी

-    नागपूरमधून काँग्रसचे अभिजीत वंजारी आघाडीवर

-    पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे जयंत आसगावकर आघाडीवर

औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत महाविकास आघाडीच्या सतीश चव्हाण यांनी बाजी मारलीय. चव्हाण यांचा हा सलग तिसरा विजय असून या विजयातून त्यांनी हॅटट्रिक मारली आहे.

महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशा अटीतटीच्या लढतीत तीन पक्ष एकत्र आल्याचा सतीश चव्हाण यांना फायदा झाला. महाविकास आघाडीमुळे मताधिक्य वाढल्याचं चव्हाण म्हणाले. पहिल्या फेरीपासूनच चव्हाण यांनी आघाडी घेतली होती. ती पाचव्या फेरीपर्यंत कायम राहिली.

सतीश चव्हाण यांना एकूण १ लाख १६ हजार ६३८ मतं मिळाली. तर भाजपचे शिरीष बोराळकर यांना ५८ हजार ७४३ मतं मिळाली. पाचव्या फेरीअखेर सतीश चव्हाण यांना ५७ हजार ८९५ मतांनी विजयी घोषित करण्यात आलं. या निवडणुकीत एकूण ३५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

Advertisement
Advertisement
Advertisement
दिनदर्शिका
२६ रविवार
रविवार, सप्टेंबर २६, २०२१

महाराष्ट्रातील शाळा, मंदिरे खुली करून ठाकरे सरकार स्वत:हून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण देत आहे, असे वाटते का?

View Results

Loading ... Loading ...
Advertisement
Advertisement
OK

We use cookies on our website to provide you with the best possible user experience. By continuing to use our website or services, you agree to their use.   More Information.