कोरोनाची लस पाहिजे आहे ? नो प्राॅब्लेम; कारमध्ये बसून या, लस टोचून घ्या

कोरोना संसर्गाला (corona infection) रोखण्यासाठी महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने (the Municipal Health Department) ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन (Drive in Vaccination) म्हणजे गाडीत बसून या आणि लस घेऊन जा , या अनोख्या उपक्रमाचे आयोजन प्रोझोन माॅलच्या सहकार्याने करण्यात आले आहे.

    औरंगाबाद (Aurangabad). कोरोना संसर्गाला (corona infection) रोखण्यासाठी महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने (the Municipal Health Department) ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन (Drive in Vaccination) म्हणजे गाडीत बसून या आणि लस घेऊन जा , या अनोख्या उपक्रमाचे आयोजन प्रोझोन माॅलच्या सहकार्याने करण्यात आले आहे. या उपक्रमाचे उद्घाटन मनपाचे अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाने (Commissioner B.B. Nemane) यांच्या हस्ते आज सोमवारी प्रोझोन माॅल (Prozone Mall) येथे करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक राजू शिंदे हे उपस्थित होते.

    औरंगाबाद शहरातील कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांच्या निर्देशानुसार विविध उपाय योजना आणि उपक्रम हाती घेण्यात येत आहेत. आज सोमवारी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्यावतीने प्रोझोन मॉल येथे ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन म्हणजे गाडीत बसून या आणि लस घेऊन जा ,या अनोख्या उपक्रमाचे उद्घाटन मनपाचे अतिरिक्त आयुक्त बी.बी. नेमाने यांच्या हस्ते करण्यात आले.

    या लसीकरण उपक्रमासाठी प्रोझोन मॉलच्या वतीने दोन मंडपाची व्यवस्था करण्यात आली आहे. कार मध्ये आल्यानंतर पहिल्या मंडप मध्ये लाभार्थीने आपल्या नावाची नोंदणी करायची आहे. दुसरा मंडपमध्ये कार गेल्यावर तेथे आरोग्य कर्मचारी लस टोचतील. यानंतर आपली कार पार्किंग मध्ये लावून किमान अर्धा तास बसायचे आहे. यानंतर लाभार्थीला घरी जाता येईल.

    या उपक्रमाबद्दल माहिती देताना महानगर पालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा व आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नीता पाडळकर म्हणाल्या की, कोरोना संसर्गाला कायमस्वरूपी रोखण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी लस घ्यावी असे आवाहन केले आहे.तसेच लसीकरणाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा म्हणून ड्राईव्ह इन व्हॅक्सिनेशन म्हणजे गाडीत बसून या आणि लस घेऊन जा, या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

    नोकरदारासाठी सकाळी अकरा ते रात्री आठ वाजेपर्यंत वेळ ठेवण्यात आली आहे. कार्यालयामधून आल्यानंतर ही लस घेता येईल, हा या मागचा उद्देश आहे सध्या तीस हजार लस उपलब्ध असल्याचे डॉक्टर नीता पाडळकर यांनी सांगितले. याप्रसंगी आरोग्य अधिकारी डॉक्टर मेघा जोगदंड, डॉक्टर कुलदीप दुतोंडे, सांस्कृतिक अधिकारी व जनसंपर्क अधिकारी संजीव सोनार, आरोग्य विभागाचे कर्मचारी व प्रोझोन माॅलचे फायनान्स मॅनेजर अमोल पाठक, मुसा शेख, आकाश जोशी, अमराव देशमुख आदीं उपस्थित होते.