parents and children

औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात अवघ्या एका महिन्याच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. या बाळाला त्याच्या आईपासूनच कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं जातंय. मात्र यापूर्वीदेखील अशा घटना घडल्या असून बाळाला वाचवण्यात यश आल्याचं दिसत होतं. या घटनेत मात्र चिमुकल्याला वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं नाही. या घटनेमुळे या कुटुंबासह पूर्ण शहरावर शोककळा पसरल्याचं वातावरण आहे. 

    देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं उच्छाद मांडलाय. कोरोनाचा हा नवा स्ट्रेन असून तो लहान मुलांसाठीही घातक ठरत असल्याचं सिद्ध झालंय. यापूर्वीच्या कोरोना स्ट्रेनमध्ये लहान मुलांना याची बाधा होत नसल्याचं दिसून आलं होतं. मात्र हा नवा स्ट्रेन लहान मुलांच्याही जीवावर उठत असल्याचं सिद्ध होतंय.

    औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात अवघ्या एका महिन्याच्या बाळाचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. या बाळाला त्याच्या आईपासूनच कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं जातंय. मात्र यापूर्वीदेखील अशा घटना घडल्या असून बाळाला वाचवण्यात यश आल्याचं दिसत होतं. या घटनेत मात्र चिमुकल्याला वाचवण्यात डॉक्टरांना यश आलं नाही. या घटनेमुळे या कुटुंबासह पूर्ण शहरावर शोककळा पसरल्याचं वातावरण आहे.

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एकूण बाधितांपैकी २० टक्के संख्या ही लहान मुलांची असल्याचं नाशिक महापालिकेच्या आरोग्य विभागानं म्हटलंय. गेल्या वर्षी कोरोनाबाधितांमध्ये सर्वाधिक संख्या ही वृद्धांची आणि कुठला ना कुठला इतर आजार असल्यामुळे रोगप्रतिकारक क्षमता कमी असणाऱ्या व्यक्तींची असायची. मात्र गेल्या काही दिवसांपासून तरुणांमध्ये कोरोनाचं प्रमाण वाढत असल्याचं चित्र आहे. त्याचप्रमाणे लहान मुलांनाही कोरोनाचा हा नवा स्ट्रेन लक्ष्य करत असल्याचं दिसून आलंय.

    लहान मुलांना होणारा कोरोना हा त्यांच्या मेंदूवर आणि हृदयावर आघात करत असल्याचं दिसून आलंय. त्यामुळं यावेळी लहान मुलांची विशेष काळजी घेणं गरजेचं असल्याचं सांगण्यात आलंय. पगर्दीत न जाणे, सोशल डिस्टन्सिंग ठेवणे, वारंवार हात धुणे, हँड सॅनिटायझरचा वापर करणे, मास्कचा वापर करणे, हे उपाय करून कोरोनाचा फैलाव रोखणे गरजेचे आहे.