भाजपा पदवीधर संपर्क कार्यालयास पंकजा मुंडे व संभाजीनगर शहर प्रभारी संभाजी पाटील निलंगेकर यांची भेट

औरंगाबाद : भारतीय जनता पार्टी मराठवाडा पदवीधर संपर्क कार्यालयास माजी मंत्री तथा राष्ट्रीय सचिव भाजपा पंकजा गोपीनाथ मुंडे, औरंगाबाद शहर प्रभारी माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर,यांनी भेट दिली व त्यांनी पदवीधर निवडणुकीसंदर्भातील तयारीचा आढावा घेतला.यावेळी नोंदणी सहप्रमुख  प्रविण घुगे यांनी पदवीधर निवडणुकीच्या संदर्भात करण्यात आलेल्या तयारीची विस्तृत माहिती दिली. गावनिहाय मतदार संपर्क अभियान,बुथ रचना या संदर्भातील माहिती पंकजा मुंडे आणि संभाजी पाटील निलंगेकर यांना सादर करण्यात आली,
येणाऱ्या पदवीधर निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा उमेदवार निवडून आण्यासाठी कार्यकर्त्यांनी निवडणूक खांद्यावर घेतली असून,मराठवाडा हा भाजपाचा बालेकिला आहे हे दाखून देणार असल्याचे प्रतिपादन भाजपा राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी केले.

येणाऱ्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा विजय करण्यासाठी सर्व ताकदीने कामाला लागून भाजपाचा विजय निश्चित करणार असल्याचे माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सांगितले .यावेळी राज्यसभा खासदार डॉ,भागवत कराड,शहर जिल्हा अध्यक्ष संजय केनेकर , माजी महापौर बापू घडामोडे,महिला मोर्चा प्रदेश सरचिटणीस सविता कुलकर्णी,बसवराज मंगरुळे,अनुसुचित जाती मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष जालिंदर शेंडगे,प्रदेश कार्यकारणी सदस्य दिलीप थोरात,प्रशांत देसरडा, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप पाटील,विकास कुलकर्णी,संजय खांबायते, संजय गव्हाणे, जिल्हा सरचिटणीस राजेश मेहता,समीर राजूरकर,शिवाजी दांडगे, अरविंद डोंणगावकर, महेश माळवदकर, प्रदेश उपाध्यक्ष महिला मोर्चा माधुरी अदवंत,महिला मोर्चा शहर अध्यक्ष अमृता पालोदकर,ओबीसी आघाडी शहर अध्यक्ष प्रा.गोविंद केंद्रे, मंडळ अध्यक्ष सिद्धार्थ साळवे , अजय शिंदे , राजू पाटील , शंकर म्हात्रे ,भाऊ सुरडकर,हेमंत खेडकर,सागर निलकंठ,सिनेट सदस्य डॉ योगिता होके पाटील , मिलिंद पोहनेरकर,मनोज शेवाळे , व्यंकटेश कमळू,संतोष उदावंत,मनोज शेवाळे,मनीषा मुंडे, संध्या कापसे , आनंद वाघ, राजू पारगावकर सचिन गुगळे, लक्ष्मीकांत तांबोळी आदी कार्यकर्ते उपस्थित होते