हे तुमच्याच कर्माचे भोग आहेत : औरंगाबाद जिल्ह्यात कलम १४४ नुसार संचारबंदीच्या आदेशात अंशत: बदल; ३१ मार्च ते ९ एप्रिल पर्यंत लॉकडाऊन

औरंगाबाद जिल्ह्याच्या हद्दीपावेतो बुधवार दि. ३१ मार्च रोजी ००.०१ वाजेपासून ते शुक्रवार दि. ९ एप्रिल २०२१ च्या २४.०० वाजेपर्यंत संचारबंदी आदेश निर्गमीत करण्यात येत आहेत. मंगळवार दि. ३० मार्च रोजी सर्व आस्थापना/कार्यालये सायंकाळी ८ वाजेपर्यंत पूर्ववत चालू राहतील.

    औरंगाबाद : जिल्ह्यात कलम १४४ नुसार लावण्यात आलेल्या संचारबंदीच्या आदेशात सार्वजनिक हिताच्या दृष्टीने अंशत: बदल जिल्हा प्रशासनाने केले आहेत. मूळ आदेशातील इतर सर्व बाबी कायम राहणार असल्याचेही जिल्हा प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे. बदलांमध्ये खालील बाबींचा समावेश आहे.

    • औरंगाबाद जिल्ह्याच्या हद्दीपावेतो बुधवार दि. ३१ मार्च रोजी ००.०१ वाजेपासून ते शुक्रवार दि. ९ एप्रिल २०२१ च्या २४.०० वाजेपर्यंत संचारबंदी आदेश निर्गमीत करण्यात येत आहेत. मंगळवार दि. ३० मार्च रोजी सर्व आस्थापना/कार्यालये सायंकाळी ८ वाजेपर्यंत पूर्ववत चालू राहतील.
    • राष्ट्रीय/राज्य / विद्यापीठ/शासन/शिक्षणमंडळ (Education Board) /( Pre-Board school ezam)/ बँक इ. स्तरावरील पूर्वनियोजित परीक्षांसाठी परीक्षांर्थींना आवागमनासाठी सूट देण्यात येत आहे. परीक्षार्थींनी संबंधित परीक्षेचे प्रवेशपत्र्‍ (Hall Ticket) सोबत बाळगणे अनिवार्य राहिल.
    • पेट्रोलपंप सर्व नागरिकांसाठी सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत खुले राहतील. नागरिकांनी अत्यावश्यक बाब असेल तरच पेट्रोल पंपावर जावे व गर्दी टाळावी अशी प्रशासनाची अपेक्षा आहे. दुपारी १२ वाजेनंतर पेट्रोलपंप धारक यांनी फक्त अत्यावश्यक सेवेमधील व ज्यांना संचारबंदीतून सुट दिलेली आहे त्यांना इंधन पुरवठा करतील.
    • औरंगाबाद जिल्ह्यातील होम आयसोलेशन मधील कोविड-१९ रुग्णांची संख्यालक्षात घेऊन हॉटेल्सना होम डिलीव्हरी साठी रात्री ८ वाजेपर्यंत अनुमती राहिल असेही जिल्हा प्रशासनाने आदेशाव्दारे कळविले आहे.