विकासकामांमुळे जनतेचा शिवसेनेवर विश्वास कायम; शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

जनतेच्या अडीअडचणी सोडविणे, संकटकाळी मदतीला धावणे, हे शिवसैनिकच करू शकतो. तसेच ग्रामीण व शहरी भागात विकासकामांमुळे जनतेचा शिवसेनेवर विश्वास कायम असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले.

    औरंगाबाद (Aurangabad).  जनतेच्या अडीअडचणी सोडविणे, संकटकाळी मदतीला धावणे, हे शिवसैनिकच करू शकतो. तसेच ग्रामीण व शहरी भागात विकासकामांमुळे जनतेचा शिवसेनेवर विश्वास कायम असल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केले. शिवजनसंपर्क अभियानादरम्यान फुलंब्री मतदारसंघात (Fulbari constituency) झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

    शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर येथे झालेल्या बैठकीस ते बोलत होते. या बैठकीस सहसंपर्कप्रमुख त्रिंबक तुपे, उपमहापौर राजेंद्र जंजाळ, शहरप्रमुख  बाबासाहेब डांगे, तालुकाप्रमुख  जिजा कोरडे, माजी उपमहापौर भाऊसाहेब वाघ, उपतालुकाप्रमख शंकर ठोंबरे, उपशहरप्रमुख ज्ञानेश्वर डांगे, सचिन वाघ, मनोज बोरा, वल्लभ भंडारी, शाहूराज चित्ते, सतीश पवार, नगरसेवक कमलाकर जगताप, मनोज गंगावे, महिला आघाडीच्या भागूबाई सिरसाट, विभागप्रमुख लक्ष्मण पिवळ, विष्णु गुंठाल, भाऊसाहेब राते, सोमनाथ नवपूते,  उपविभागप्रमुख राजेंद्र आण्णा तोरणमल, रमेश तारापुरे, सतीश काळे, महेश मुरदरे, नाना जगताप, संजय कोरडे, रामेश्वर कोरडे, संजय मडमारकर, संदीप जाधव, शिवाजी काकडे, रामेश्वर कोरडे, प्रमोद कोल्हे, मेघश्याम कोल्हे, रामेश्वर शिंदे, युवासेनेचे उपशहर अधिकारी प्रशांत कुरहे, योगेश जगताप, भूषण बकाल, ज्ञानेश्वर कुलकर्णी, ऋषिकेश तोरणमल, शुभम वाघ, ज्ञानेश्वर कुबेर,ओंकार लिंबेकर आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.