sanjay rathod

शिवसेना नेते संजय राठोड आज पोहरादेवी मंदिरात येणार आहेत. सकाळी साधारण साडे अकरा वाजताच्या सुमारास संजय राठोड पोहरादेवीला येतील.कोणताही अनुचित प्रकारच घडू नये यासाठी पोलिसांनी पोहरादेवी मंदिराच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे

    औरंगाबाद: पूजा चव्हाण आत्महत्येला दोन आठवड्यातून अधिककाळ उलटून गेल्यानंतर पहिल्यांदाच नॉट रिचेबल असणारे राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड आज पोहरादेवी मंदिरात येणार आहेत. सकाळी साधारण साडे अकरा वाजताच्या सुमारास संजय राठोड पोहरादेवीला येतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

    या दरम्यान कोणताही अनुचित प्रकारच घडू नये यासाठी पोलिसांनी पोहरादेवी मंदिराच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याठिकाणी बॉम्बशोधक पथकाची गाडीही दाखल झाली आहे. तसेच रस्त्यांवर बॅरिकेटस लावण्याचे काम सुरु आहे. जेणेकरून गर्दीला नियंत्रणात ठेवणे शक्य होईल ,  कोणताही अनुचित प्रकार घडू नये, असा पोलिसांचा प्रयत्न आहे.