पोहायला गेलेल्या दोघांवर काळाचा घाला; औरंगाबादमधील मनाला चटका लावणारी घटना

अतीक अकिल शेख (19) आणि नदीम नासेर शेख (17) अशी मृता पावलेल्या दोघांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अतीक आणि नदीम आपल्या मित्रांसोबत तलावात पोहायला गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही तलावात बुडाले. दोघे बाहेर येत नसल्याचे पाहून इतर मित्रांनी आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक जमा झाले.

    औरंगाबाद : मित्रांसोबत पोहायला गेलेल्या दोघांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ही घटना रविवारी दुपारी साडेतीन वाजताच्या दरम्यान गंधेली शिवारातील नवीन बीड हायवे रोडलगत असलेल्या तलावात घडली.

    अतीक अकिल शेख (19) आणि नदीम नासेर शेख (17) अशी मृता पावलेल्या दोघांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अतीक आणि नदीम आपल्या मित्रांसोबत तलावात पोहायला गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही तलावात बुडाले. दोघे बाहेर येत नसल्याचे पाहून इतर मित्रांनी आरडाओरडा केला. त्यांचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक जमा झाले.

    घटनेची माहिती मिळताच चिकलठाणा पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. नागरिकांच्या मदतीने दोघांना बेशुद्धावस्थेत बाहेर काढण्यात आले. घाटी येथील रुग्णालयात नेले असता डाॅक्टरांनी दोघांना मृत घोषीत केले. दोघांच्या मृत्यूमुळे गारखेडा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी चिकलठाणा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.