रावसाहेब दानवेंचं अब्दुल सत्तारांना ओपन चॅलेंज, नेमकं काय म्हणाले? : वाचा सविस्तर

सिल्लोडमध्ये आयोजित त्यांच्या सत्कार सोहळ्यात बोलताना ते म्हणाले की, मतदारसंघात सध्या बाबर शिरला आहे. तो नागरिकांना आमिष दाखवत आहे. अब्दुल सत्तार खूप झालं 50 कोटी रुपये आणील, मात्र आपण एकच रस्ता 2400 कोटींचा केला. अब्दुल सत्तार आणि मी केलेल्या कामाची पैज लावू, मग बघू कोण हरतं ते, असं आव्हानही दानवेंनी अब्दुल सत्तार यांना दिलं आहे.

    औरंगाबाद : केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे सध्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. जन आशिर्वाद यात्रेच्या निमित्ताने ते पुन्हा एकदा राजकीय फटकेबाजी करताना पहायला मिळत आहेत. औरंगाबाद हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. आपल्या बेधडक वक्तव्यासाठी ओळखले जाणारे दानवे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सिल्लोडचे आमदार आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात जाऊन दानवेंनी त्यांना आव्हान दिलं आहे.

    दानवे नेमकं काय म्हणाले?

    सिल्लोडमध्ये आयोजित त्यांच्या सत्कार सोहळ्यात बोलताना ते म्हणाले की, मतदारसंघात सध्या बाबर शिरला आहे. तो नागरिकांना आमिष दाखवत आहे. अब्दुल सत्तार खूप झालं 50 कोटी रुपये आणील, मात्र आपण एकच रस्ता 2400 कोटींचा केला. अब्दुल सत्तार आणि मी केलेल्या कामाची पैज लावू, मग बघू कोण हरतं ते, असं आव्हानही दानवेंनी अब्दुल सत्तार यांना दिलं आहे. मराठवाड्याला रेल्वेच्या जेवढ्या जास्तीत जास्त सुविधा देता येतील तेवढ्या देण्याचा माझा प्रयत्न असल्याचंही दानवे याप्रसंगी म्हणाले आहेत. इतकंच नाहीतर त्यांनी सत्तारांना डिवचण्याची एकही संधी यावेळी सोडली नाही.

    दरम्यान सत्तार हे यापुर्वी दुसऱ्या पक्षात होते आता शिवसेनेत आहेत. ते सुद्धा मंत्री आहेत. आपल्या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी सत्तार यांनी पुढाकार घ्यावा, असंही दानवे म्हणाले आहेत. आपण आता शिवसेनेचे नेते आहात. गावगावात गेलं पाहीजे. लोकांशी संवाद साधला पाहिजे असंही दानवे सत्तार यांना उद्देशून म्हणाले आहेत. गावात जावं आणि फुटाणे फेकत बसावं, शिवसेनेची शाखा काढत बसावं. त्यांनी काढलेल्या या शाखा शिवसेनेच्या शाखा नाहीत, या सत्तारच्या शाखा आहेत. सत्तारला माझं चॅलेंज आहे सिल्लोड तालुक्याचा जिल्हा करून दाखवा मी पाठीशी आहे, असंही रावसाहेब दानवे म्हणाले.