Some MLAs in Maharashtra ask questions in Assembly to make money, MIM MLA's sensational allegation

कोरोनाचे संकट खूप मोठे आहे, रेमडिसिवर, ऑक्सिजन, बेडसाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची धावधाव सुरू आहे. मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णांना इंजेक्शन, ऑक्सिजनची नितांत गरज आहे. अशा संकटाच्या परिस्थितीत देखील काही लोक, मेडिकलचालक रेमडिसिवर,ऑक्सिजन सिलेंडरचा काळाबाजार करत असल्याच्या असंख्य तक्रारी आमच्याकडे येत आहेत. रेमडिसिवर, ऑक्सिजनचा काळाबाजार करून ते विकतांना कुणी आढळला, तर त्याची माहिती आम्हाला द्या, किंवा त्याला पकडून आमच्या स्वाधीन करा, त्याला आम्ही चोप देऊ, असा इशारा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे.

    औरंगाबाद : कोरोनाचे संकट खूप मोठे आहे, रेमडिसिवर, ऑक्सिजन, बेडसाठी रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची धावधाव सुरू आहे. मृत्यूशी झुंज देणाऱ्या रुग्णांना इंजेक्शन, ऑक्सिजनची नितांत गरज आहे. अशा संकटाच्या परिस्थितीत देखील काही लोक, मेडिकलचालक रेमडिसिवर,ऑक्सिजन सिलेंडरचा काळाबाजार करत असल्याच्या असंख्य तक्रारी आमच्याकडे येत आहेत. रेमडिसिवर, ऑक्सिजनचा काळाबाजार करून ते विकतांना कुणी आढळला, तर त्याची माहिती आम्हाला द्या, किंवा त्याला पकडून आमच्या स्वाधीन करा, त्याला आम्ही चोप देऊ, असा इशारा एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिला आहे.

    जिल्हाधिकारी कार्यालयातील कोरोना आढावा बैठक संपल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलतांना इम्तियाज जलील यांनी काळाबाजार करणाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला. शहरातील शासकीय वैद्यकीय रुग्णालय (घाटी), जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) येथून रेमडिसिवर इंजेक्शन चोरीला गेल्याचे आणि त्यांची काळाबाजारात विक्री झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहे.

    अशा भयंकर परिस्थितीत देखील ज्यांना पैसे कमावावेसे वाटतात, त्यांची किव येते. अशा लोकांना वेळीच धडा शिकवला गेला पाहिजे, तरच अशा प्रकारांना आळा बसू शकेल. राज्यात व शहरात कोरोना रुग्णांना रेमडिसिवर आणि ऑक्सिजनची गरज आहे, त्यामुळे त्यांचे प्राण वाचवणे शक्य होणार आहे. त्यामुळे केवळ औरंगाबाद शहरातच नाही, तर राज्यात जिथे कुठे इंजेक्शन, ऑक्सिजन सिलेंडरची काळ्याबाजारात विक्री होत असेल, त्याची माहिती आमच्या स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना तात्काळ द्या, शक्य असेल तर त्या व्यक्तीला पकडून आणा आणि आमच्या हवाली करा, आम्ही त्यांना भर चौकात खेटराने बडवू, असे आवाहन देखील इम्तियाज जलील यांनी केले.

    सर्वात आधी मी त्या व्यक्तीला बुटाने मारेन आणि लोकांच्या हवाली करेल. लोक संकटात असतांना पैशाच्या मोहापायी काळाबाजार केला तर त्याची शिक्षा काय असते हे आम्ही निश्चित शिकवू आणि मग त्याला पोलीसांच्या स्वाधीन करू, असा इशाराही त्यांनी दिला. काळाबाजार करणाऱ्यांना धडा शिकवण्याची ही मोहिम फक्त शहारातच नाही तर राज्यात राबवली जाईल, तशा सूचनाच मी आमच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना देणार असल्याचे इम्तियाज जलील यांनी सांगितले.