kelgav ritos

औरंगाबाद(aurangabad) जिल्ह्यातील केळगावात दंगल(riots in kelgav) उफाळली आहे. विनयभंगांतील आरोपीच्या घरावर गावकऱ्यांकडून हल्ला करण्यात आला आहे. दीडशे ते दोनशे गावकऱ्यांनी आरोपीच्या घरावर हल्ला केला असल्याची माहिती देण्यात आली आहे. आरोपीच्या घराबाहेर एवढ्या मोठ्या प्रमाणात गावकरी जमा झाले होते की हल्लेखोरांना पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला आहे.

औरंगाबाद : औरंगाबाद(aurangabad) जिल्ह्यातील केळगावात दंगल(riots in kelgav) उफाळली आहे. विनयभंगातील आरोपीच्या घरावर गावकऱ्यांकडून हल्ला करण्यात आला आहे. दीडशे ते दोनशे गावकऱ्यांनी आरोपीच्या घरावर हल्ला केला असल्याची माहिती देण्यात आली आहे. आरोपीच्या घराबाहेर एवढ्या मोठ्या प्रमाणात गावकरी जमा झाले होते की हल्लेखोरांना पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. पोलीस पाटील महिलेचा आरोपीने सातत्याने विनयभंग केला होता. त्यामुळे आरोपीच्या त्रासाला कंटाळवून पीडित महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे आत्महत्येपूर्वी पोलीस पाटील महिलेने व्हीडीओ केला होता. जो मोठ्या प्रमाणात व्हायरल आहे.
या जीवघेण्या घटनेमध्ये पीडित थोडक्यात बचावली असून त्यांच्यावर सिल्लोडच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खरंतर, या प्रकरणात पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल करत आरोपीला ताब्यात घेतलं होतं. पण त्याला जामीन मिळाल्यामुळे गावकरी संतापले होते. त्यामुळे त्यांनी थेट घरावर हल्ला करण्यास सुरुवात केली.

मिळालेल्या माहितीनुसार, या हल्ल्यामध्ये आरोपीच्या घराची मोडतोड करण्यात आली आहे. संतप्त नागरिकांनी पोलीस व्हॅनवरही दगडफेक केल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना हवेत पाच राउंड फायर करत गोळीबार करण्यात आला. यामुळे सध्या गावाला छावणीचं स्वरूप आलं असून हल्लेखोरांची धरपकड सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे.