मराठवाडा ऑटो क्लस्टरमध्ये संकल्पला सुरुवात, कुशल मनुष्यबळ तयार होणार

अ‍ॅटोमोबाईल क्षेत्रातील तज्ञ आणि प्रमाणित(सर्टिफाईड) प्रशिक्षक निर्माण करण्याचा सर्वप्रथम मान देशात औरंगाबादच्या मराठवाडा ऑटो क्लस्टरला मिळाला आहे. कुशल मनुष्यबळ केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय, ऑटोमोटिव्ह स्कील डेव्हलपमेंट काँसिल, जेआयझेड , महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट सोसायटी आणि मराठवाडा ऑटो क्लस्टर यांच्या संयुक्त विद्यमाने ट्रेनिंग टू द ट्रेनर अर्थात टीओटी प्रोगाम राबवण्यात येणार आहे.

    औरंगाबाद- औद्योगिक क्षेत्रात लागणारे कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देणारे प्रमाणित प्रशिक्षक तयार करण्यासाठी केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाच्या वतीने संकल्प उपक्रम सुरू करण्यात आला आहे. संकल्प अंतर्गत सी एन सी प्रोग्रामिंग आणि अ‍ॅडव्हान्स वेल्डींग टेक्नॉलॉजी अंतर्गत जर्मन ड्यूएल ट्रेनिंगच्या संकल्पनेवर आधारित प्रशिक्षकांच्या प्रशिक्षण वर्गाचे औपचारिक उद्घाटन दि. २६ ऑगस्ट रोजी मराठवाडा ऑटो क्लस्टर येथे होणार आहे.

    अ‍ॅटोमोबाईल क्षेत्रातील तज्ञ आणि प्रमाणित(सर्टिफाईड) प्रशिक्षक निर्माण करण्याचा सर्वप्रथम मान देशात औरंगाबादच्या मराठवाडा ऑटो क्लस्टरला मिळाला आहे. कुशल मनुष्यबळ केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय, ऑटोमोटिव्ह स्कील डेव्हलपमेंट काँसिल, जेआयझेड , महाराष्ट्र स्किल डेव्हलपमेंट सोसायटी आणि मराठवाडा ऑटो क्लस्टर यांच्या संयुक्त विद्यमाने ट्रेनिंग टू द ट्रेनर अर्थात टीओटी प्रोगाम राबवण्यात येणार आहे. रोबोटिक टेक्नॉलॉजी ,सीएनसी आणि अ‍ॅडव्हान्स वेल्डींग टेक्नॉलॉजी क्षेत्रात सर्टिफाईड प्रशिक्षक बनवण्यासाठी लागणारे प्रशिक्षण आता मराठवाडा ऑटो क्लस्टरमध्ये उपलब्घ झाले आहे. त्यासाठीच्या प्रशिक्षण वर्गांना पेâब्रुवारी २०२१ मध्ये सुरुवात झाली.

    संकल्पचे औपचारिक उद्घाटन उद्या दि.२६ ऑगस्ट रोजी होत आहे. ऑटोमोटिव्ह स्किल डेव्हलपमेंट काँसिल (एएसडीसी) चे मुख्य कार्यकारी अधिकारी अरिंदम लाहिरी आणि जीआयझेड चे डॉ. रॉडनी यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशिक्षण वर्गांना औपचारिक सुरुवात होईल. मराठवाडा ऑटो क्लस्टरचे अध्यक्ष मुनिष शर्मा आणि व्यवस्थापकीय संचालक जयंत पाडाळकर यांची विशेष उपस्थिती राहील. याप्रसंगी जीआयझेड आणि मराठवाडा ऑटो क्लस्टर यांच्यात कौशल्यविकास कार्यक्रम राबवण्यासाठी सामंजस्य करार होणार आहे अशी माहिती मराठवाडा ऑटो क्लस्टरचे संचालक आशिष गर्दे यांनी दिली.

    काय आहे संकल्प उपक्रम

    कुशल मनुष्यबळाची वाढती मागणी लक्षात घेऊन जागतिक बँकेच्या सहकार्याने केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाने संकल्प उपक्रमाची सुरुवात केली आहे. रोबोटिक्स टेकनोलॉजी, सिएनसी प्रोग्रामिंग आणि अत्याधुनिक वेल्डिंग टेक्नॉलॉजी या विषयातील सर्टिफाईड प्रशिक्षक संकल्प उपक्रमात तयार करण्यात येणार आहेत. अ‍ॅडव्हान्स वेल्डींग आणि सीएनसी प्रोग्रामिंग अंतर्गत तीन बॅचेसच्या प्रशिक्षणाला सुरुवात झाली आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रातील तज्ज्ञ प्रशिक्षक या वर्गांच्या माध्यमातून तयार होणार असून मराठवाडा ऑटो क्लस्टर यात महत्वाची भूमिका देशपातळीवर बजावत आहे.