एएससीडीसीएल, Aurangabad
एएससीडीसीएल, Aurangabad

रस्त्यांचा कायापालट करण्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लिमिटेडने (एएससीडीसीएल) डिझाईन स्पर्धेची घोषणा केली आहे़ ‘स्ट्रिटस् फॉर पिपल’अंतर्गत शहरातील चार रस्त्यांचा विकास करण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात येत आहे. स्पर्धा सर्वांसाठी खुली असून विजेत्यांना आकर्षित बक्षिस देण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर निवडलेल्या डिझाईन्सचा विचार करून त्यादृष्टीने रस्त्यांचा कायापालट करण्यात येणार आहे.

औरंगाबाद (Aurangabad). रस्त्यांचा कायापालट करण्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉपोर्रेशन लिमिटेडने (एएससीडीसीएल) डिझाईन स्पर्धेची घोषणा केली आहे़ ‘स्ट्रिटस् फॉर पिपल’अंतर्गत शहरातील चार रस्त्यांचा विकास करण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात येत आहे. स्पर्धा सर्वांसाठी खुली असून विजेत्यांना आकर्षित बक्षिस देण्यात येणार आहे. इतकेच नव्हे तर निवडलेल्या डिझाईन्सचा विचार करून त्यादृष्टीने रस्त्यांचा कायापालट करण्यात येणार आहे.

केंद्रीय शहरी विकास खात्यांतर्गतच्या दी इंडिया स्मार्ट सिटी मिशन यांनी राष्ट्रीय स्तरावर ‘स्ट्रिटस् फॉर पिपल’ योजनेत औरंगाबाद महापालिकेने सहभाग नोंदविला आहे. याअंतर्गत शहरातील रस्त्यांच्या आर्थिकदृष्ट्या विकास, नागरिकांची सुरक्षा आणि लहान मुला-मुलींसाठी मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करण्यात येणार आहे़ पैठण गेट ते गुलमंडी (मॅचवेल), क्रांती चौक ते गोपाळ टि चौक, सिडकोतील कॅनॉट परिसर, प्रियदर्शिनी गार्डन आणि एमजीएम दरम्यानचा रस्त्यांचा विकास याअंतर्गत करण्यात येणार आहे.

स्मार्ट रोड (प्रतिकात्मक फोटो)

नागरिकांच्या स्वप्नातील रस्ते साकारण्यासाठी या चार रस्त्यांसाठी डिझाईन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थी, आर्किटेक्ट, अभियंते आणि डिझाइनरांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे़ शहरातील रस्ते कसे असावेत, हे प्रत्यक्ष नागरीकांनीच डिझाईन्सच्या माध्यमातून सांगून स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन एएससीडीसीएलचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा मनपा प्रशासक आस्तिक कुमार पांडेय यांनी केले आहे. उत्कृष्ठ डिझाईन पाठविणाऱ्यांना आकर्षित बक्षिस देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. स्पर्धकांना १७ डिसेंबरपर्यंत रस्त्यांचे डिझाईन पाठविणे आवश्यक आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तसेच अधिक माहिती http://www.aurangabadsmartcity.in (डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू डॉट औरंगाबाद स्मार्ट सिटी डॉट इन) किंवा https://smartnet.niua.org/indiastreetchallenge/cities/aurangabad/ (स्मार्टनेट डॉट एनआययुए डॉट ओआरजी इंडिया स्ट्रीट चॅलेंज सीटीज औरंगाबाद) यावर उपलब्ध आहे.

नागरिकांच्या स्वप्नातील रस्ते साकारणार
स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांचे डिझाईन तज्ज्ञांच्या मदतीने निवडले जातील. निवडलेल्या डिझाईन्सचा उपयोग प्रत्यक्षात स्वप्नातील रस्ते साकारण्यासाठी करण्यात येईल. पार्किंग, फेरीवाला झोन तयार करताना शहरातील रस्ते पादचाऱ्यांसाठी अधिक मैत्रीपूर्ण वातावरण निर्माण करणारे असावेत याचा भर स्पर्धेत असेल. या रस्त्यांचे सौंदर्यीकरण, ग्रीनरी आणि नागरीकांना रस्त्याच्या बाजूला बसण्याची सोय आदी कल्पनांचा विचार करण्यात येईल.