मला कॉपी पाठवा, नाहीतर संध्याकाळपर्यंत निलंबित करेन; अब्दुल सत्तारांनी ग्रामसेवकाला भरला दम

कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संभाजी डोणगावकर यांचं निधन झालं. मात्र त्यांचं मृत्यूपत्र देण्यासाठी ग्रामसेवक टाळाटाळ करत होता. हा प्रकार समजल्यानंतर ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार चांगलेच भडकले. त्यांनी थेट ग्रामसेवकाला फोन लावला. त्यानंतर त्यांनी मृत्यू प्रमाणपत्राची कॉपी लगेच पाठवा, नाहीतर संध्याकाळ पर्यंत निलंबित करेन, असा दम भरला.

  औरंगाबाद : औरंगाबादमध्ये मृत्यू प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्रामसेवाकला अब्दुल सत्तार यांनी फोनवरच झापले. मृत्यू प्रमाणपत्राची कॉपी लगेच पाठवा, नाहीतर संध्याकाळ पर्यंत निलंबित करेन, असा दम सत्तार यांनी ग्रामसेवकाला भरला.

  नेमकं काय घडलं?

  कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संभाजी डोणगावकर यांचं निधन झालं. मात्र त्यांचं मृत्यूपत्र देण्यासाठी ग्रामसेवक टाळाटाळ करत होता. हा प्रकार समजल्यानंतर ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार चांगलेच भडकले. त्यांनी थेट ग्रामसेवकाला फोन लावला. त्यानंतर त्यांनी मृत्यू प्रमाणपत्राची कॉपी लगेच पाठवा, नाहीतर संध्याकाळ पर्यंत निलंबित करेन, असा दम भरला.

  अब्दुल सत्तार नेमकं काय म्हणाले?

  हॅलो,

  तुम्ही मृत्यू प्रमाणपत्र का दिले नाही?

  ते आताच काढून पाठवा पहिले तात्काळ

  नाही केलं तर तुम्हाला संध्याकाळपर्यंत सस्पेंडची ऑर्डर दिली तर असं चालेल का काहीतरी

  तुम्ही लोकांच्या सेवेसाठी आहे. मृत्यू-जन्म सर्टिफिकेट हे देणं हे आपलं कर्तव्य आहे.

  तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडत नसाल तर तुम्ही अकार्यक्षम आहे, असं नाही चालणार

  मला कॉपी पाठवा बस्स, मला बाकी काही सांगू नका. तात्काळ कॉपी पाठवा. (फोन ठेवला)

  त्यानंतर अब्दुल सत्तार उपस्थितांना म्हणतात, काय काम करतात हे, मृत्यू प्रमाणपत्र देत नाही म्हणजे किती बोगस लोक आहेत, राजकारण कुठे करावं याची पण एक सीमा असते.

  अब्दुल सत्तारांकडून नुकसानीची पाहणी

  07 सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे औरंगाबाद शहरातील अनेक भागात पाणी शिरले. या दिवशी एवढा विक्रमी पाऊस पडला की खाम नदी तुंबून तिचे पाणी सखल भागात शिरले. त्यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. येथील नुकसानीची पाहणी आज राज्य महसूल मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली. खाम नदीवरील सध्याचा पूल पाडून नवीन उंच पूल बांधण्याकरिता तसेच नदीपात्र आणखी खोल करण्यासाठी अब्दुल सत्तार यांनी एक कोटी दहा लाख रुपयांचा निधी पंधरा दिवसात उपलब्ध करून देण्याची घोषणा केली.