शिवसेनेची नारायण राणेंच्या विरोधात क्रांतीचौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, संतप्त शिवसैनिकांचे क्रांतीचौकात जोडे मारो आंदोलन

संतप्त शिवसैनिकांसह छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, क्रांतीचौकात शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली राणेंच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केले.

    औरंगाबाद –  नारायण राणे यांनी केलेल्या बेताल वक्तव्या विरोधात आज दि. 24 सकाळी क्रांतीचौक पोलीस ठाण्यात शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी तक्रार दाखल केली आहे. संतप्त शिवसैनिकांसह छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, क्रांतीचौकात शिवसेना प्रवक्ते जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली राणेंच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केले.

    राणेंच्या ‘कोंबडीचोर’ या उपाधीला साजेशा जिवंत कोंबड्या देखील या आंदोलनात आणल्या गेल्या होत्या. आंदोलनाच्या वेळी शिवसैनिकांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसून येत होत्या राणेंच्या विरोधात घोषणांनी परिसर अक्षरश: दणाणून गेला होता.

    याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष जेजुरकर, शहप्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, विधानसभा संघटक राजू वैद्य, गोपाल कुलकर्णी, उपशहरप्रमुख रमेश बहुले, अंबादास मस्के, संजय हरणे, बापू पवार, सुगंधकुमार गडवे, सतीश निकम, जयसिंह होलिये, उपतालुकाप्रमुख विष्णू जाधव पाटील, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हा संघटक समीर कुरेशी, विभागप्रमुख सुधिर चौधरी, नंदू लबडे, सतीश कटकटे, शाखाप्रमुख गोरख सोनवणे ,राहुल यलदी, पंकज वाडकर, ज्ञानेश्वर शेळके ,रणजीत दाभाडे ,स्वप्नील साबळे , नितीन पवार, शिवाजी गायकवाड ,नारायणसिंग राठोड, गणेश लोखंडे अंन्साराम वडकते नारायण जाधव आदी शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते