shiv sena asks central government to stop use of loudspeakers on mosques vb

शिवसेना नेते आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांचा साखर कारखाना जप्त करण्याचे आदेश साखर आयुक्तांकडून देण्यात आले आहेत. भुमरे यांच्या मालकीच्या औरंगाबादेतील कारखान्यावर टाच आली आहे. पैठण तालुक्यात भुमरे यांचा शरद सहकारी साखर कारखाना आहे. हा कारखान जप्त करण्याचे आदेश औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांची ऊसाची देणी थकल्यामुळे जप्तीचे आदेश काढल्याचे सांगितले जाते.

    औरंगाबाद : शिवसेना नेते आणि फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांचा साखर कारखाना जप्त करण्याचे आदेश साखर आयुक्तांकडून देण्यात आले आहेत. भुमरे यांच्या मालकीच्या औरंगाबादेतील कारखान्यावर टाच आली आहे.

    पैठण तालुक्यात भुमरे यांचा शरद सहकारी साखर कारखाना आहे. हा कारखान जप्त करण्याचे आदेश औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांची ऊसाची देणी थकल्यामुळे जप्तीचे आदेश काढल्याचे सांगितले जाते.

    शेतकऱ्यांची तब्बल 17 कोटी 49 लाख रुपयांची देणी थकल्यामुळे औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांना कारखान्यावर जप्ती आणण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कारखाना जप्त करून शेतकऱ्यांची देणी देण्याचा आदेश साखर आयुक्तांनी दिला आहे.

    मात्र, थकित रक्कम भरल्याचा दावा मंत्री भुमरे यांनी केला आहे.भुमरे हे औरंगाबादमधील शिवसेनेचे दिग्गज नेते आहेत. 1995 पासून ते पैठण मतदारसंघातून सलग पाच वेळा ते विधानसभेवर आमदारपदी निवडून आले आहेत.